रविवार, 12 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Modified: सोमवार, 9 नोव्हेंबर 2020 (16:28 IST)

दिवाळीच्या पूर्वी छोटी दिवाळी का साजरी करतात, त्यामागील कारणे जाणून घ्या

दिवाळीच्या पूर्वी छोटी दिवाळी साजरी करण्याची प्रथा आहे. छोटी दिवाळी नरक चतुर्दशीला साजरी करतात. मान्यतेनुसार, छोटी दिवाळीच्या रात्री घरातील वडिलधाऱ्यांकडून एक दिवा लावून संपूर्ण घरात फिरवून त्या दिव्याला घराच्या बाहेर ठेवून येतात. या दिवशी घरांमध्ये मृत्यूच्या देव यमाची पूजा करण्याचे महत्त्व देखील आहे परंतु आपणास हे माहीत आहे का दिवाळीच्या अवघ्या एक दिवसा पूर्वी छोटी दिवाळी साजरी का करतात. चला जाणून घेऊ या मागील कहाणी.
 
* म्हणूनच साजरी करतात छोटी दिवाळी  -
एकदा रती देव नावाचे राजा होते. त्यांनी आपल्या अवघ्या जीवनात कोणतेही पाप केले नसे. एके दिवशी त्यांच्यासमोर एकाएकी यमदूत येऊन उभे राहिले. यमदूताला असे आपल्या समोर बघून ते आश्चर्यचकित होऊन यमदूताला म्हणाले की मी तर आपल्या जीवनात कोणतेही पाप केलेले नाही तरी ही मला नरकात जावे लागणार का ? हे ऐकून यमदूत म्हणे की राजन एकदा आपल्या दारातून एका ब्राह्मणाला उपाशी जावे लागले होते. हे त्याच पापाचे परिणाम आहे. 
 
* राजाने प्रायश्चित करण्यासाठी वेळ मागितला -
हे ऐकून राजाने प्रायश्चित करण्यासाठी एका वर्षाचा वेळ मागितला. यमदूतांनी राजाला एका वर्षाचा वेळ दिला. राजा ऋषींकडे पोहोचले आणि त्यांना आपली सर्व कहाणी सांगितली आणि त्यातून मुक्त होण्याचा उपाय विचारला. तेव्हा ऋषींनी सांगितले की आश्विन महिन्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीचा उपास करावा आणि ब्राह्मणाला जेवू घालावे. राजाने ऋषींच्या सांगण्यानुसार तसेच केले आणि पापातून स्वतःला मुक्त केले. या नंतर त्यांना विष्णू लोकात स्थान मिळाले. त्या दिवसापासून पाप आणि नरकापासून मुक्ती मिळविण्यासाठी आश्विन चतुर्दशीच्या दिवशी उपवास आणि दिवा लावण्याची प्रथा सुरू झाली.
 
* भगवान श्री हरी विष्णूंचे दर्शन करावे -
असे म्हणतात की छोटी दिवाळीला सूर्योदयाच्या पूर्वी अभ्यंग स्नान केल्याने स्वर्गाची प्राप्ती होते. अंघोळ केल्यावर विष्णू किंवा कृष्णाचे दर्शन देऊळात जाऊन करावे. या मुळे आपल्या सौंदर्यात देखील वाढ होते आणि अवकाळी मृत्यू होण्याचा धोका टळतो. शास्त्रानुसार नरक चतुर्दशी कलयुगात जन्मलेल्या लोकांसाठी खूप उपयुक्त आहे, म्हणून कलियुगी माणसांनी या दिवसाचे नियम आणि महत्त्व समजायला पाहिजे.