दिवाळीत स्वच्छता करतांना घरातून या वस्तू काढून टाका व घरात समृद्धी आणा...
दिवाळी काही दिवसातच सुरु होत आहे. अश्यावेळेस सार्वज आपल्या घराची, दुकानाची, ऑफिसची साफ सफाई करतात. तसेच दिवाळी सण नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याचा आणि तुमच्या घरात सकारात्मकता आणि समृद्धी आणण्याचा एक प्रसंग असतो. स्वच्छतेच्या या शुभ प्रसंगी, घरात लक्ष्मीचे आगमन होण्यासाठी काही वस्तू काढून टाकणे अत्यंत आवश्यक आहे. तर चला दिवाळीच्या स्वच्छतेदरम्यान कोणत्या वस्तू घरातून काढून टाकाव्या त्या जाणून घेऊ या...
जुने कपडे-
जे कपडे जीर्ण झालेले आहे, फाटलेले आहे ते घरातून बाहेर टाकून द्यावे. या वस्तू उर्जेचा प्रवाह रोखतात आणि आळस वाढवतात.
जुने कॅलेंडर-
वास्तुशास्त्रानुसार जुने कॅलेंडर कधीही घरात ठेऊ नये. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढवू शकतात.
वाळलेली रोपे-
वाळलेली किंवा मृत झाडे जीवन ऊर्जा कमी करतात. त्यांना घरात ठेवल्याने दुःख आणि नकारात्मकता वाढते.
जुने औषधे-
कालबाह्य झालेली किंवा उपयुक्त नसलेली औषधे घरात ठेवणे अशुभ मानले जाते. ते आजाराला आमंत्रण देतात.
रद्दी व अनावश्यक कागदपत्रे-
जुन्या पावत्या, वर्तमानपत्रे, मासिके, फाटलेली पुस्तके आणि कागदाचे ढीग घरात उर्जेचे अडथळे निर्माण करतात. त्यांना स्वच्छ करणे अत्यंत महत्वाचे आहे.
तुटलेले इलेक्ट्रॉनिक्स-
जुने रेडिओ, टीव्ही, मोबाईल फोन किंवा इतर कोणत्याही तुटलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जे बराच काळ पडून आहे ते नकारात्मक ऊर्जा वाढवू शकतात.
तुटलेल्या वस्तू-
तुटलेली भांडी, मूर्ती, आरसे, घड्याळ किंवा घरात ठेवलेली इतर कोणतीही तुटलेली वस्तू नकारात्मक उर्जेचा स्रोत आहे. लक्ष्यात घ्या वास्तुशास्त्रानुसार, घरात त्यांची उपस्थिती दुर्दैव आणि गरिबीला आमंत्रण देते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik