शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Updated : मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019 (10:38 IST)

दिवाळीच्या काळी रात्री या प्रकारे करा काली पूजा, चमत्कार घडेल

दिवाळीच्या 5 दिवसीय उत्सवात देवी कालीची दोनदा पूजा होते. एक नरक चतुर्दशीच्या दिवशी ज्याला काली चौदस देखील म्हणतात आणि दुसरी दिवाळीच्या रात्री. काली पूजा विशेष उद्देशाने केले जाते.
 
नरक चतुर्दशी : याला काली चौदस देखील म्हणतात. काली चौदसच्या रात्री देवी कालीची पूजा होते. खरंतर पूर्ण भारतात रूप चतुर्दशीला यमराज प्रती दीप प्रज्जवलित करुन आस्था प्रकट करतात परंतू बंगाल येथे हा दिवस आई कालीच्या वाढदिवस म्हणून साजरा केला जातो आणि याच कारणामुळे याला काली चौदस देखील म्हणतात. या दिवशी कालीची पूजा करुन शत्रूंवर विजय प्राप्त करण्याचा आशीर्वाद मिळतो.
 
दिवाळी : भारतातील अनेक राज्यांमध्ये अमावस्‍येला देवी लक्ष्‍मी आणि गणपतीची पूजा केली जाते परंतू पश्चिम बंगाल, उड़ीसा आणि असम येथे या प्रसंगावर काली देवीची पूजा केली जाते. ही पूजा मध्यरात्री केली जाते. पश्‍चिम बंगाल येथे लक्ष्मी पूजा दसर्‍याच्या 6 दिवसांनंतर केली जाते जेव्हाकी दिवाळीच्या दिवशी कालीची पूजा केली जाते.
 
का करतात काली पूजा?
राक्षसांचा वध केल्यानंतर जेव्हा महाकालीचा क्रोध कमी झाला नाही तेव्हा महादेव स्वयं त्यांच्या पायाशी लोळून गेले. महादेवाच्या स्पार्शामुळे देवी महाकालीचा क्रोध नाहीसा झाला. या प्रसंगामुळे त्यांच्या शांत रूप लक्ष्मीची पूजा करण्याची सुरुवात झाली. जेव्हाकी काही राज्यांमध्ये या दिवशी देवीच्या रौद्ररूप कालीची पूजा करण्याची परंपरा आहे. काली पूजा केल्याने संकटांपासून बचाव होतो.
 
काली पूजेचं महत्व काय?
दुष्‍ट आणि पापींना नष्ट करण्यासाठी देवी दुर्गाने कालीचा रुप घेतला होता. श्रद्धापूर्वक काली पूजन केल्याने जीवनातील सर्व दु:ख चमत्कारिक रूपाने नाहीसे होतात असे मानले गेले आहे. शत्रूंचा नाश होतो आणि जन्‍मकुंडली बसलेले राहू- केतु देखील शांत होतात. कालीची आराधना केल्याने भक्त निडर आणि सुखी होतात. काली आपल्या भक्तांची रक्षा करते.
 
सामान्य पूजा : दोन प्रकारे काली पूजा केली जाते. एक सामान्य आणि दुसरी तंत्र पूजा. सर्व भक्त सामान्य पूजा करु शकतात. सामान्य पूजेत विशेष रूपाने 108 जास्वंदीचे फुलं, 108 बेलपत्र आणि माळ, 108 मातीचे दिवे आणि 108 दूर्वा अर्पित करण्याची परंपरा आहे. सोबतच सिझनल फळं, मिठाई, खिचडी, खीर, तळलेल्या भाज्या आणि इतर पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. या विधीमध्ये सकाळपासून उपास करुन रात्री नैवेद्य, होम-हवन आणि पुष्पांजली देणे समील आहे.
 
तंत्र पूजा : अनेक जागी तंत्र साधनेसाठी कालीची उपासना केली जाते.
 
मंत्र
ऊं क्रीं कालिकायै नमः 
 
या मंत्राचा दररोज 108 वेळा जप केल्याने आर्थिक लाभ प्राप्ती होते. याने धन संबंधित समस्या दूर होतात. देवीच्या कृपेने सर्व काम शक्य होतात. 15 दिवसात एकदा कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला विडा आणि मिठाईचा नैवेद्य दाखवावा.
 
देवी समक्ष धूप : कोर्ट-कचेरीचे प्रकरण किंवा ऋणाची समस्या असल्यास नऊ दिवस देवीसमक्ष गुग्गुलची सुंगधित धूप जाळावी. सामान्य रूपात गुप्त नवरात्रीमध्ये देवीची कृपा मिळवण्यासाठी नऊ दिवस देवीसमोर अखंड दिवा लावावा आणि दुर्गा सप्तशती किंवा देवी मंत्राचा जप करावा.
 
लक्ष्मी बंधन : कोणी लक्ष्मीला बांधून ठेवलं असल्याचे वाटत असेल तर देवीला दररोज दोन लाकड्याच्या उदबत्तया (बांबू चालणार नाही) आणि एक धूपबत्ती लावावी. दर शुक्रवारी काली मंदिरात जाऊन पूजा करावी आणि देवीला प्रत्येक बंधन मुक्त होण्याची प्रार्थना करावी.
 
शनी दोषापासून मुक्तीसांठी : शनिवारी मोहरीचं तेल, काळे तीळ, काळी उडिद घेउन देवीची विधीपूर्वक पूजा केल्याने शनी दोष दूर होईल.