1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Updated : बुधवार, 23 ऑक्टोबर 2019 (12:04 IST)

Diwali 2019 प्रत्येक दिवसासाठी एक खास उपाय

Diwali 2019
दिवाळीचे 5 दिवस धन संकट दूर करण्यासाठी सर्वात उत्तम मानले गेले आहे. शास्त्रानुसार या दिवशी कर्ज निवृत्ती उपाय अमलात आणले नाही तर व्यक्तीला जीवनात अर्थ, उपकार, दया रूपात कोणत्याही प्रकारे कर्ज घ्यावे लागतं. हे कर्ज फेडल्यावरच लक्ष्मी प्राप्ती शक्य आहे. तर जाणून घ्या 5 दिवसांसाठी 5 उपाय...
 
* धन तेरसच्या दिवशी  13 दिवे लावावे आणि प्रत्येक दिव्यात एक कवडी टाकावी. दिवे पूर्ण झाल्यावर त्यातील 13 कवड्या स्वच्छ करून आपल्या तिजोरीत ठेवाव्या.
 
* नरक चतुर्दशी (रूप चतुर्दशी) च्या दिवशी पवित्रतेने पाच प्रकाराच्या फुलांचा हार तयार करून दूर्वा आणि बेलपत्र लावून देवीला अर्पित करावा. माल्यार्पण करताना मौन पाळावे. या उपायाने यश वाढतं.
 
* दिवाळीच्या रात्री अकरा वाजेनंतर एकाग्र होऊन डोळे बंद करून या प्रकारे ध्यान करा की देवी लक्ष्मी आपल्यासमोर कमळावर विराजित असून आपण देवीला कमळ अर्पित करत आहात. या प्रकारे 108 मानसिक कमळ पुष्प अर्पित करावे. असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा होते. सोबतच विष्णू सहस्रनाम किंवा गोपाल सहस्रनाम पाठ करणे अती उत्तम ठरेल.
 
* पाडव्याच्या दिवशी भोजन तयार करून देवतांच्या निमित्ताने मंदिरात, पितरांच्या निमित्ताने गायीला, क्षेत्रपालाच्या निमित्ताने कुत्र्यांना, ऋषींच्या निमित्ताने ब्राह्मणांना, कुळ देवांच्या निमित्ताने पक्ष्यांना, भूतादींच्या निमित्ताने भिकार्‍यांना द्यावे. सोबतच झाडाला जल अर्पित करावे. सूर्याला अर्घ्य द्यावे, अग्नीला तूप अर्पित करावे, मुंग्यांना कणीक आणि मासोळ्यांना कणेकेच्या गोळ्या देण्याने घरात बरकत राहते.
 
* भाऊबीजच्या दिवशी सकाळी शुद्ध पवित्र होऊन रेशीम दोरा गुरु आणि इष्ट देवाचे स्मरण करत धूप दीप नंतर त्यांच्या उजव्या हाताला बांधावा. दोरा बांधताना ईश्वराचे स्मरण करत राहावे. हा उपायाने वर्षभर सुरक्षा मिळते. 
 
पैशांची चणचण दूर करण्यासाठी 5 दिवस हे उपाय अमलात आणा आणि मनोभावे हे उपाय केल्याने यश नक्कीच हाती लागेल.