शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Updated : मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019 (15:04 IST)

दिवाळी का साजरी केली जाते

दिव्यांचा सण दिवाळी का साजरी केली जाते यामागे वेगवेगळ्या कहाण्या आणि परंपरा आहेत. म्हणतात की जेव्हा प्रभू श्रीराम 14 वर्षांच्या वनवासांनतर अयोध्याला परत आले होते तेव्हा त्याच्यां प्रजेने आपल्या घर आणि नगराची सफाई करुन दिवे लावून त्यांचा स्वागत केला होता.
 
दुसर्‍या कथेनुसार जेव्हा श्रीकृष्णाने राक्षस नरकासुराचे वध करुन प्रजेला त्यांच्या दहशतापासून मुक्त केले तेव्हा द्वारकेच्या प्रजेने दिवे लावून त्यांचे स्वागत केले होते.
 
एक आणखी परंपरेनुसार सतयुगात जेव्हा समुद्र मंथन झाले होते तेव्हा धन्वंतरि आणि देवी लक्ष्मी प्रकट झाल्यावर दिवे लावून आनंद व्यक्त केले गेले होते.
 
यामागील कारण काहीही असलं तरी हे निश्चित आहे की दिवे आनंद प्रकट करण्यासाठी लावले जाता.
 
भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याला सत्य आणि ज्ञान प्रदान करणारे मानले गेले आहे कारण दिवा स्वयं जळून दुसर्‍यांना प्रकाश देतो. दिव्याच्या या विशेष गुणामुळे धार्मिक पुस्तकांमध्ये दिव्याला ब्रह्मा स्वरूप मानले गेले आहे.
 
'दीपदान' केल्याने शारीरिक आणि आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते. जेथे सूर्य प्रकाश पोहचू शकत नाही तेथे दिव्याचा प्रकाश पोहचून जातो. दिव्याला सूर्याचा भाग 'सूर्यांश संभवो दीप:' म्हटले गेल आहे.
 
धार्मिक पुस्तक 'स्कंद पुराण' अनुसार दिव्याचा जन्म यज्ञ मध्ये झाला होता. यज्ञ देवता आणि मनुष्य यांच्यात संवादाचा माध्यम आहे. यज्ञाच्या अग्नीने जन्मलेल्या दिव्याची पूजा करणे महत्वपूर्ण आहे.