1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Updated : शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2022 (09:58 IST)

Vasubaras गाय वासराची पूजा करण्याचे नियम आणि विधी

vasubaras
कार्तिक शुक्ल पक्ष प्रतिपदेला अर्थात दीपावलीच्या दुसर्‍या दिवशी वसुबारसची पूजा केली जाते. या दिवशी गोपूजनाचे फार महत्व आहे. काही भागात दारात शेणाची गोवर्धन पर्वताची प्रतिकृती उभारून पूजा केली जाते. श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वताखाली गाई गुरांना एकत्र करून त्यांचे रक्षण केले होते, त्याबद्दल या पर्वताची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे पूजन करण्यात येते.
 
काय आहे यामागील कथा
अशी कथा आहे की समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशित ठेवून हा सण साजरा केला जातो. अनेक जन्मांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी व गायीच्या शरीरावर जेवढे केस आहे तेवढे वर्ष स्वर्गात वास व्हावा या कामनांपुरतीसाठी ही पूजा केली जाते.
 
तसेच असे म्हणतात की या दिवशी श्री विष्णूंची आपतत्त्वात्मक तरंग सक्रिय होऊन ब्रह्मांडात येते. ह्या तरंगा विष्णुलोकातील कामधेनू अव‍तरित करते. म्हणून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गायीची पूजा केली जाते.
 
गोवर्धन पूजा कशी करावी?
सकाळीच लवकर उठून शरीराला तेल लावून स्नान करावे.
नंतर स्वच्छ कपडे परिधान करून ध्यान करावे.
आपल्या घराच्या किंवा देवघराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शेणाचा गोवर्धन पर्वत तयार करा.
पर्वतावर झाडाच्या फांद्या किंवा फुलांनी सजावट करा.
नंतर अक्षता आणि फूलांनी पर्वताची विधिवत पूजा करा.
 
पूजा करताना खालील प्रार्थना म्हणा.
गोवर्धन धराधार गोकुळ त्राणकारक।
विष्णुबाहु कृतोच्छ्राय गवां कोटीप्रदो भव।।
 
या दिवशी प्रामुख्याने गायीचे पूजन करतात
गायीला विविध अलंकार आणि मेंदीने सजवा.
त्यानंतर गंध, अक्षता आणि फूलांनी पूजा करा.
नैवद्य अर्पण करून खालील मंत्र म्हणून प्रार्थना करा.
 
लक्ष्मीर्या लोक पालानाम् धेनुरूपेण संस्थिता।
घृतं वहति यज्ञार्थे मम पापं व्यपोहतु।।
 
या दिवसाचे काही नियम
स्त्रिया या दिवशी दिवसभर उपास करतात.
ह्या दिवशी गहू, मूग खात नाही.
स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपास सोडतात.
या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. 
या दिवशी तव्यावर बनवलेले पदार्थही खात नाहीत.
 
कार्तिक शुक्ल प्रतिपदा पूजन
या दिवशी लोक गाय-बैल आणि इतर प्राण्यांना आंघोळ घालून त्यांची पूजा करतात.
गायीला मिष्ठान्न खाऊ घालून तिची आरती करून प्रदक्षिणा घातली जाते. अनेक प्रकारच्या पक्वान्नांचा पर्वत तयार करून त्यामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून पूजा केली जाते. या दिवशी संध्याकाळी दैत्यराज बलीची पूजा केली जाते.

Edited by : Smita Joshi