गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Updated : शुक्रवार, 17 ऑक्टोबर 2014 (16:30 IST)

पुष्य नक्षत्रात कोणत्या वंस्तूची खरेदी करायला पाहिजे

gurupushaya nakshatra
यंदा 16 ऑक्टोबररोजी गुरुपष्य नक्षत्र येत आहे. हे नक्षत्र दिवाळीपूर्वी येते आणि जर हे गुरुवारी आले तर खूप शुभ मानले जाते. या योगामध्ये खरेदी करण्यात आलेली वस्तू प्रदीर्घ काळापर्यंत लाभ देते असे मानले जाते. शास्त्रानुसार जर गुरुपुष्य नक्षत्रामध्ये एखाद्या कार्‍याची सुरुवात करण्यात आली किंवा खरेदी केली तर त्यात नक्कीच यश प्राप्त होते. पुष्य नक्षत्रात कुठली वस्तू खरेदी केल्याने फायदा होतो ते पाहा....
 
- जर गुरुपुष्य योगात एखाद्याने सोन्याचे दागिने खरेदी केले तर त्याला यामधून स्थायी लाभ प्राप्त होतो.  
 
- जर गुरुपुष्य नक्षत्रात जमिनीत गुंतवणूक केली तर जास्त लाभ होण्याची शक्यता आहे. पण जमीनी खरेदी करताना सावधगिरी बाळगणे फारच महत्त्वाचे आहे.