मंगळवार, 21 ऑक्टोबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. दिवाळी फराळ
Written By
Last Modified: रविवार, 19 ऑक्टोबर 2025 (08:00 IST)

Diwali Lakshmi Pujan : देवी लक्ष्मीसाठी नैवेद्यात बनवा या पाककृती

Lakshmipujn naivedya
रव्याचा शिरा
साहित्य-
रवा  - १ कप
तूप - १/२  कप
साखर - ३/४  कप
दूध - १ कप
केशर - दुधात भिजवलेले
वेलची पावडर
काजू, बदाम, पिस्ता
मनुका
 
कृती-
सर्वात आधी कढईत तूप गरम करा आणि त्यात रवा घालून मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत भाजा.
एका भांड्यात दूध आणि पाणी एकत्र गरम करा. रवा भाजला गेल्यावर हळूहळू हे गरम मिश्रण कढईत घाला आणि ढवळत राहा जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. रवा शिजल्यानंतर साखर आणि भिजवलेले केशर घाला. साखर वितळेपर्यंत ढवळा. तुपात परतलेले काजू, बदाम, पिस्ता आणि मनुका घाला. वेलची पावडर मिसळा. शीरा तयार झाल्यावर थंड करून स्वच्छ ताटात ठेवा.  
 
काजू कतली
साहित्य-
एक कप काजू बारीक केलेले 
१/३ कप साखर
एक चमचा तूप
अर्धा टीस्पून वेलची पूड
गरजेनुसार दूध
सजावटीसाठी चांदीचे वर्क 
 
कृती-
सर्वात आधी काजू काही तास उन्हात वाळवा किंवा हलके भाजून घ्या आणि नंतर बारीक पूड करा.  आता एक चतुर्थांश कप पाण्यात साखर मिक्स करा. तसेच काजूचे मिश्रण चांगले घट्ट होण्यासाठी पाक शिजवा. आता हळूहळू काजू पावडर सिरपमध्ये घाला आणि सतत ढवळत राहा जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. जेव्हा मिश्रण पॅनच्या बाजूने निघू लागते तेव्हा त्यात १ चमचा तूप आणि वेलची पूड घाला. जर तुम्हाला  काजू कतली अधिक स्वादिष्ट बनवायची असेल तर तुम्ही त्यात केशर किंवा गुलाबजलचे काही थेंब घालू शकता. केशर त्याचा रंग हलका सोनेरी बनवतो आणि त्याची चव उत्कृष्ट होते. तर गुलाबपाणी सौम्य सुगंध देते.आता एका प्लेटला तूप लावून सर्व मिश्रण काढून घ्या व तयार मिश्रणावर चांदीचा वर्क लावा व सुरीच्या मदतीने आकारात कापून घ्या. तर चला तयार आहे आपली काजू कतली रेसिपी. 

अनारसे 
साहित्य-
तांदूळ - एक वाटी
खसखस - दोन चमचे
गूळ - ३/४ वाटी  
पाणी - १/४ वाटी  
तूप  
मीठ चिमूटभर
 
कृती-
सर्वात आधी तांदूळ स्वच्छ धुऊन ३-४ दिवस पाण्यात भिजवावेत. दररोज पाणी बदलावे. आता चौथ्या दिवशी तांदूळ निथळून सावलीत वाळवावेत. पूर्णपणे कोरडे झाल्यावर बारीक कुटून पीठ बनवावे. आता एका पॅनमध्ये गूळ आणि पाणी घालून मंद आचेवर गूळ वितवावा. गूळ पूर्णपणे वितळल्यानंतर गाळून घ्या. आता गुळाचा पाक एकतारी होईपर्यंत उकळवावा. आता तांदळाच्या पिठात हळूहळू गुळाचा गरम पाक घाला आणि पीठ मळा. पीठ खूप घट्ट किंवा खूप सैल नसावे. मळलेल्या पिठात एक चमचा तूप घालून चांगले मळावे. पीठ मऊ आणि एकजीव होईल. मळलेले पीठ रात्रभर झाकून ठेवावे. आता पिठाचे लहान गोळे बनवावेत. एका ताटलीत किंवा प्लास्टिक शीत वर खसखस पसरावी. प्रत्येक गोळा खसखशीवर ठेवून हलक्या हाताने पातळ गोल थापावे. आता कढईत तूप गरम करावे आणि अनारसे तुपात हलक्या हाताने सोडावेत. खसखशीची बाजू वर ठेवावी. तसेच मंद आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत तळावे. तळलेले अनारसे टिश्यू पेपरवर काढून अतिरिक्त तूप निथळू द्यावे. थंड झाल्यावर अनारसे हवाबंद डब्यात ठेवल्यास पंधरा दिवस टिकतात.
 
राजभोग मिठाई
साहित्य- 
पनीर 
वेलची पावडर
बदाम
पिस्ता
केशर
फूड कलर 
 
कृती-
सर्वात आधी प्रथम वेलची पावडर, बदाम, पिस्ता आणि केशर एकत्र मिसळा. यानंतर, पाण्यात साखर घाला आणि ते पूर्णपणे विरघळेपर्यंत मंद आचेवर ढवळत रहा. यानंतर, एका मोठ्या प्लेटमध्ये पनीर मॅश करा. आता त्यात मैदा घाला आणि मऊ पेस्ट तयार करा, आता त्याचे छोटे गोळे बनवा. तसेच आता ते पातळ करा आणि त्यात ड्रायफ्रूट मिश्रण घाला आणि एक गोल गोळा बनवा आणि गॅस बंद करा. आता साखर पाण्यात चांगले विरघळवा. यानंतर त्यात फूड कलर घाला, आता या पाण्यात पनीर पेस्टचे बनलेले गोळे घाला आणि काही वेळ शिजू द्या. जास्त घट्ट होऊ नये तुम्ही त्यात पाणी देखील घालू शकता. काही वेळात राजभोग मिठाई तयार होईल. तर चला तयार आहे आपली राजभोग मिठाई रेसिपी, थंड झाल्यावर नक्कीच सर्व्ह करा.
 
मुगाचे लाडू  
साहित्य-   
एक वाटी मूग डाळ  
३/४ वाटी साखर 
अर्धा वाटी तूप
१/४ वाटी खोबरं  
एक चमचा वेलची पूड
काजू आणि बदाम  
किशमिश  
 
कृती-
सर्वात आधी हिरवी किंवा पिवळी मूग डाळ स्वच्छ धुऊन कोरडी करा. नंतर कढईत मंद आचेवर डाळ खरपूस भाजून घ्या. डाळीचा रंग हलका तपकिरी होईपर्यंत आणि सुगंध येईपर्यंत भाजा. भाजलेली डाळ थंड करून मिक्सरमध्ये बारीक पूड करा. साखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. जर गूळ वापरत असाल, तर तो बारीक चिरून किंवा खिसून घ्या. कढईत १/२ वाटी तूप गरम करा. त्यात चिरलेले काजू आणि बदाम घालून हलके परतून घ्या. किशमिश घालून हलके तळा. त्याच तुपात मूग डाळीची पूड घालून ४-५ मिनिटे मंद आचेवर परतून घ्या. जर खोबरं वापरत असाल, तर तेही परतून घ्या. परतलेल्या मिश्रणात साखरेची पावडर आणि वेलची पूड घाला. सर्व मिश्रण नीट एकजीव करा. मिश्रण थोडे कोमट असतानाच त्याचे छोटे छोटे लाडू बांधा. लाडू बांधताना हाताला थोडे तूप लावल्यास लाडू गुळगुळीत होतील. लाडू थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवा.  
 
तांदळाचे लाडू 
साहित्य- 
एक वाटी- तांदूळ  
३/४ वाटी साखर (किंवा गूळ, चवीप्रमाणे)
अर्धा वाटी तूप
वाटी खोबरं (खवलेले, पर्यायी)
एक चमचा वेलची पूड
काजू आणि बदाम  
किशमिश  
 
कृती-
कृती-
सर्वात आधी तांदूळ स्वच्छ धुऊन कोरडे करा. नंतर कढईत मंद आचेवर तांदूळ खरपूस भाजून घ्या. तांदूळ हलके तपकिरी आणि सुगंधी होईपर्यंत भाजा. भाजलेले तांदूळ थंड करून मिक्सरमध्ये बारीक पूड करा. साखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आता गूळ वापरत असाल, तर तो बारीक चिरून किंवा खिसून घ्या. कढईत १/२ वाटी तूप गरम करा. त्यात चिरलेले काजू आणि बदाम घालून हलके परतून घ्या. किशमिश घालून हलके तळा. त्याच तुपात तांदळाची पूड घालून ४-५ मिनिटे मंद आचेवर परतून घ्या. तांदळाचा कच्चा वास जाईल. खोबरं वापरत असाल, तर तेही परतून घ्या. परतलेल्या मिश्रणात साखरेची पावडर किंवा गूळ आणि वेलची पूड घाला. सर्व मिश्रण नीट एकजीव करा. मिश्रण कोमट असतानाच त्याचे छोटे छोटे लाडू बांधा.  लाडू बांधताना हाताला थोडे तूप लावल्यास लाडू गुळगुळीत होतील.  लाडू थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवा.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.