सोमवार, 20 ऑक्टोबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. दिवाळी फराळ
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 ऑक्टोबर 2025 (15:18 IST)

दिवाळी फराळात बनवा सर्वांना आवडणारी खमंग कुरकुरीत शेव पाककृती

Sev
साहित्य-    
डाळीचे पीठ- आठ वाटया
तेल-दोन वाटी
तिखट- आठ चमचे
मीठ
हळद- अर्धा चमचा
ओवापूड-दोन चमचे
कृती-  
सर्वात आधी दोन वाटी तेल, दोन वाटी पाणी घालून हाताने परातीत मिक्स करावे. आता त्या तेलात  ओवापूड, मीठ, तिखट, हळद घालावी व डाळीचे पीठ घालावे. खूप घट्ट भिजवायचे नाही. आता पसरट कढईत तेल गरम करावे. वरील तयार पीठ सोर्‍यात मावेल एवढे भरावे. सोर्‍याला कढईतल्या तेलावर धरून हाताने गोल फिरवत सोर्‍या दाबून कढईत शेवेचा गोल आकारात पाडावी. थोडया वेळाने दूसर्‍या बाजूनी हलक्या गुलाबी रंगावर तळून घ्या व तळलेली शेव चाळणीत काढावी. अशा रितीने सर्व पिठाची शेव तळून घ्यावी. तर चला तयार आहे आपली खमंग अशी शेव पाककृती.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik