रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. दिवाळी फराळ
Written By
Last Updated : गुरूवार, 24 ऑक्टोबर 2024 (13:11 IST)

दिवाळी फराळ विशेष : साखरेचे शंकरपाळे

Sugar Shankarpale
साहित्य-
एक कप मैदा
अर्धा कप तूप
एक कप दूध
दीड कप पिठी साखर
अर्धा चमचा वेलची पूड  
 
कृती-
साखरेचे शंकरपाळे बनवण्यासाठी सर्वात आधी दुधात पिठी साखर मिक्स करावी. तसेच हे मिश्रण चांगल्याप्रकारे एकजीव करावे. दूध व साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर आता मैदा घेऊन त्यामध्ये वेलची पूड घालावी. तसेच आता या मैद्यामध्ये तयार केले दूध घालून मळून घ्या. व दोन गोळे तयार करा. दोन्ही गोळे पोळपाटावर वेगवेगळे लाटून घ्यावे. व शंकरपाळ्यांच्या आकारात कापून घ्यावे. आता एका कढईत तेल गरम करून कापलेले शंकरपाळे लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यावे. तर चला तयार आहे आपले दिवाळी विशेष साखरेचे शंकरपाळे रेसिपी. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik