Festival Posters
✕

उन्हाळ्यात कैरी पन्हे पिण्याचे हे 5 फायदे Aam Panna Recipe

Updated: सोमवार, 8 मे 2023 (23:24 IST)
 
कैरीचे पन्हे उन्हाळ्याच्या दुष्परिणामांपासून संरक्षण करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे उष्णतेच्या तडाख्यात अडकण्यापासून बचाव होईल आणि शरीरातील द्रवपदार्थ टिकून राहण्यास मदत होईल.

उन्हाळ्याच्या दिवसात याच्या रोजच्या वापरामुळे पोटाच्या समस्या दूर राहतील आणि पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत होईल. हे एक उत्तम पाचक पेय आहे.
 
पोटाची उष्णता दूर करण्यासोबतच पाचक रस तयार होण्यास मदत होते.
 
व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे ते तुमची प्रतिकारशक्ती वाढवते आणि तुम्हाला अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांपासून वाचवते.
 
टीबी, अॅनिमिया, कॉलरा यांसारख्या आजारांवरही हे टॉनिक म्हणून काम करते. यासोबतच घामाने शरीरातून बाहेर पडणाऱ्या सोडियम आणि झिंकची पातळीही राखते.

कैरीचे पन्हे
साहित्य- एक किलो कैरी, दोन मोठे चमचे साखर, भाजलेल्या जीर्‍याची पूड, तीन छोटे चमचे मीठ, काळे मीठ एक छोटा चमचा, आवश्यकतेनुसार पुदिन्याची पाने.
 
कृती- कैरीचे सालं काढून घ्या. कुकरमध्ये कैरी आणि पाणी टाकून तीन शिट्या होऊ द्या. थंड झाल्यावर उकळलेली कैरीचा आतील बलक व्यवस्थित मैश करून घ्या. त्यात दहा कप थंड पाणी टाकून मिक्सरमधून फिरवून घ्या आणि गाळून घ्या. त्यात साखर, मीठ, काळे मीठ, जिरेपूड टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. पुदिन्याची पाने चिरून टाका. थंड-थंड पन्हं सर्व्ह करा.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

कांद्याची साले फेकून देऊ नका! केस दाट, लांब आणि चमकदार बनवण्यासाठी असा करा वापर

रात्री झोपताना सतत विचार येतात? अतिविचार थांबवण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी करा हे सोपे उपाय!

मनावरील ताण आणि चिंता दूर करायची आहे? मन शांत ठेवण्यासाठी दररोज करा ही प्रभावी योगासने; योग्य पद्धत जाणून घ्या!

पंचतंत्र : उद्दत नावाच्या एका गाढवाची गोष्ट

दिवाळीचा फराळ आधीच बनवून ठेवायचा आहे? कोणता पदार्थ किती दिवस टिकतो ते जाणून घ्या

पुढील लेख
Show comments