सोमवार, 18 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By

Watermelon Punch उन्हाळ्यात टरबूज पंच पिण्याचे फायदे माहीतेय का?

water melon juice
Watermelon Punch उन्हाळ्याच्या दिवसात थंड आणि गोड टरबूज पंच, शेक किंवा रस घेण्यापेक्षा काहीही चांगले असू शकत नाही. टरबूज केवळ चवीनुसारच नाही तर आरोग्याच्या दृष्टीनेही खूप फायदेशीर आहे.
 
चला टरबूज पंच बनवण्याची सोपी पद्धत आणि त्याचे फायदे जाणून घेऊया.
 
साहित्य-  500 ग्राम टरबजू (लाल), 1/2 लहान चमचा काळं मीठ, 1/2 लिंबाचा रस, 2 चमचे साखर किंवा आवडीप्रमाणे, काही पुदिन्याची पाने, 1/2 लहान चमचा चाट मसाला, 1/4 चमचा मिरंपूड, 4-5 आइस क्यूब 
 
कृती - टरबूज पंच करण्यासाठी प्रथम टरबूज सोलून घ्या, सर्व बिया वेगळे करा आणि त्याचे तुकडे करा. पुदिन्याची पाने बारीक चिरून घ्या, नंतर चिरलेले टरबूज, पुदिना, साखर, काळे मीठ आणि लिंबाचा रस मिक्सरच्या पॉटमध्ये टाका आणि ज्यूस तयार करा. चाळणीने गाळून ग्लासमध्ये भरून चाट मसाला शिंपडा. वर बर्फाचे तुकडे घाला आणि टरबूजचे काही छोटे तुकडे आणि पुदिन्याच्या पानांनी सजवलेले टरबूज पंच सर्व्ह करा.
 
जाणून घ्या टरबूजाचे फायदे -
1. तुमच्या शरीराचे पोषण करण्यासाठी टरबूज हा एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे टरबूजाचा रस शरीराला थंडावा देतो आणि शरीरात चरबी जमा होऊ देत नाही.
 
2. टरबूजमध्ये व्हिटॅमिन-ए आणि सी मुबलक प्रमाणात असल्यामुळे ते डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
 
3. कूल-कूल टरबूज पंच तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते.
 
4. टरबूजमध्ये असलेले लाइकोपीन कॅन्सरसारख्या भयंकर आजाराशी लढण्यास मदत करते. टरबूज पेय तुमच्या शरीरातील कर्करोगाच्या पेशी नष्ट करून तुम्हाला संरक्षण प्रदान करते.
 
5. टरबूजमध्ये पाण्याचे प्रमाण जास्तीत जास्त असते, त्यामुळे टरबूजाच्या सेवनाने शरीराला पाणीपुरवठा होण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसात डिहायड्रेशनचा सामना करण्यासाठी टरबूज पंच हा एक चांगला पर्याय आहे.
 
6. टरबूजाचे सेवनाने त्वचा ताजेतवानी आणि नमी राखण्यास मदत होते. याने सौंदर्यांत भर पडते.
 
7. टरबूज पंच मध्ये काळं मीठ, मिरंपूड आणि पुदिना वापरल्याने अपचनाची समस्या दूर होते.
 
Disclaimer : चिकित्सा, आरोग्य संबंधी उपाय, योग, धर्म, ज्योतिष इतर विषयांवर वेबदुनिया मध्ये प्रकाशित लेख व समाचार केवळ आपल्या माहितीसाठी आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. या संबंधी कोणतेही उपाय अमलात आणण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.