कैरीचे थंडगार पन्हे
चैन्य महिन्यास प्रारंभ झाला आणि अंगाची लाही-लाही करणार्या उकाड्यापासून सुटका करण्यासाठी थंड काहीतही हवे असते. बाजारात अनेक थंड पदार्थ मिळतात मात्र, ते अनैसर्गिक पदार्थांपासूनही बनविलेले असून शकतात. याचे शरीरावर दुष्परिणामही जाणवू शकतात. असे अपाय होऊ नयेत म्हणून उत्तम कैरीचे पन्हे हा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे तृष्णाही भागते शिवाय शरीरावर कोणताही अपाय न होता उलट फायदाच होतो. जाणून घेऊया हे पन्हे तयार करण्याची पद्धत...
साहित्य :
२ ते ३ मोठ्या कैर्या (कच्चे आंब)
२ ते ३ वेलची (ठेचून किंवा पावडर)
४ ते ५ काळी मिरी (ठेचून किंवा पावडर)
२ चमचे काळे मीठ
गूळ / साखर (आवश्यकतेनुसार)
कृती :
सर्वप्रथम कैर्यांना पाण्याने स्वच्छ धुवा. त्यानंतर प्रेशर कुकरमध्ये पुरेसे पाणी घालून शिजायला ठेवा. ३ ते ४ शिट्या झाल्यानंतर गॅस बंद करा व थंड होऊ द्या.
आता उकडलेल्या कैर्यांचे साल काढून त्यातला रस एका भांड्यात काढा. वेलची पावडर व मीठ टाकून चांगले घुसळा. आता जवळ जवळ चार कप पाणी टाका आणि आवश्यकतेनुसार साखर वा गुळ टाकून पुन्हा ग्यासवर एक उकळी येईपर्यंत शिजवा. कैरीचे पन्हे तयार आहे तुम्ही त्याला थंड करून केव्हाही पिऊ शकता.