मथुरेसारखी रवाळ आणि घट्ट लस्सी आत घरीच बनवा; लिहून घ्या रेसिपी
मथुरामध्ये घट्ट लस्सी अतिशय प्रसिद्ध आहे. तसेच मथुरेसारखी रवाळ आणि घट्ट लस्सी घरी बनवण्यासाठी सोपी रेसिपी आज आपण पाहणार आहोत.
साहित्य-
ताजं घट्ट दही – २ कप (आंबट नसावे)
पिठीसाखर – ४ ते ५ चमचे (चवीनुसार)
म्हशीचे दूध किंवा ताजी साय (मलाई) – २ चमचे
वेलची पूड – १/२ चमचा
केशर – ५-६ काड्या (१ चमचा कोमट दुधात भिजवलेल्या)
बारीक चिरलेले सुके मेवे (काजू, बदाम, पिस्ता) – २ चमचे
बर्फाचे तुकडे – ३ ते ४
कृती-
दही उपसणे: कपड्याने किंवा गाळणीने दह्यातील जास्तीचे पाणी काढून टाका, ज्यामुळे दही अत्यंत घट्ट होईल.
दही घुसळणे: एका मोठ्या भांड्यात घट्ट दही आणि पिठीसाखर घ्या. लस्सी बनवण्यासाठी मिक्सरऐवजी पारंपरिक रवीचा (मथाणी) वापर करा. मिक्सर वापरल्याने लस्सी पातळ होते. दही रवीने २ ते ३ मिनिटे व्यवस्थित घुसळून घ्या.
स्वाद आणि केशर: घुसळलेल्या दह्यात वेलची पूड, भिजवलेले केशर आणि बर्फाचे तुकडे घालून पुन्हा १ मिनिट रवीने फिरवून घ्या.
सर्व्ह करणे: तयार लस्सी एका मातीच्या कुलहडमध्ये (किंवा काचेच्या ग्लासात) ओता.
मथुरी स्टाइल टॉप्पिंग: लस्सीवर वरून १ जाड थर मलाईचा (साय) लावा. त्यावर चिरलेले सुके मेवे आणि केशर लावून थंडगार सर्व्ह करा. तसेच मथुरेच्या लस्सीमध्ये पाण्याच्या थेंबाचाही वापर केला जात नाही; त्यामुळे पाणी न घालता फक्त घट्ट दह्याचाच वापर करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik