1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Last Updated : शुक्रवार, 1 मे 2026 (15:41 IST)

नेहमीच्या चहापेक्षा अधिक घट्ट, मलईदार आणि सुगंधी असा शाही बासुंदी चहा

Basundi chai
हा चहा नेहमीच्या चहापेक्षा घट्ट आणि शाही असतो.दुध आटवून त्यात वेलची, केशर आणि भरपूर साखर घालून हा चहा बनवला जातो.  नेहमीच्या चहापेक्षा हा चहा अधिक घट्ट, मलईदार आणि सुगंधी असतो.  चहाप्रेमींसाठी ही एक पर्वणीच असते. बासुंदी चहा म्हणजे चहाप्रेमींसाठी एक शाही ट्रीट आहे. नेहमीच्या चहापेक्षा हा चहा अधिक घट्ट, मलईदार आणि सुगंधी असतो.  

साहित्य-
दोन कप चहासाठी एवढे साहित्य लागते
दूध: १.५ कप (शक्यतो पूर्ण फॅट असलेले म्हशीचे दूध वापरा)
पाणी: १/२ कप
चहा पावडर: २ छोटे चमचे
साखर: ३ चमचे (बासुंदी चहा थोडा गोड छान लागतो)
मिल्क पावडर: २ चमचे (दूध लवकर घट्ट करण्यासाठी)
वेलची आणि सुंठ पूड: १/२ छोटा चमचा
केशर: ४-५ काड्या (पर्यायी)
चारोळी किंवा बदामाचे काप: सजावटीसाठी
कृती-
दूध आटवणे: एका जाड बुडाच्या पातेल्यात दूध गरम करायला ठेवा. दूध थोडे गरम झाले की त्यात २ चमचे मिल्क पावडर मिसळा (जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत). दूध मंद आचेवर सतत हलवत राहा जोपर्यंत ते थोडे घट्ट होत नाही.
चहाचे डिकोशन: दुसऱ्या बाजूला एका लहान पातेल्यात १/२ कप पाणी गरम करा. त्यात चहा पावडर, साखर आणि सुंठ-वेलची पूड टाकून चांगलं उकळून घ्या.
एकत्रीकरण: आता आटवलेल्या घट्ट दुधात हे तयार चहाचे डिकोशन गाळून टाका.
उकळवणे: चहा टाकल्यानंतर पुन्हा ५-७ मिनिटे मंद आचेवर चहा चांगला उकळू द्या. यामुळे चहाला बासुंदीसारखा गडद रंग आणि टेक्सचर येईल.
शाही टच: शेवटी त्यात केशरच्या काड्या आणि थोडे चारोळी टाका. यामुळे चहाला अगदी लग्नाकार्यातील किंवा हॉटेलमधील बासुंदी चहासारखी चव येईल. तर चला तयार आहे गरमागरम आणि शाही बासुंदी चहा, हा चहा खारी किंवा टोस्टसोबत नक्कीच पिऊन पहा.
खास टिप्स:
मलई: चहा उकळत असताना बाजूला जमणारी साय (मलई) पुन्हा चहातच मिक्स करा, यामुळे चहा अधिक रिच लागतो.
साखर: बासुंदी चहाची चव साखरेमुळे खुलते, त्यामुळे डाएटचा विचार बाजूला ठेवून थोडी जास्त साखर वापरा.
घट्टपणा: जर तुम्हाला मिल्क पावडर वापरायची नसेल, तर दूध जास्त वेळ आटवा किंवा त्यात थोडा मावा टाका.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik