मंगळवार, 17 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By
Last Modified: मंगळवार, 17 डिसेंबर 2024 (08:00 IST)

चविष्ट व्हेजिटेबल सूप रेसिपी

साहित्य-
हिरवी कांद्याची पात 
गाजर
हिरवी लसणाची पात
मटार 
बटाटे 
पालक
मेथी 
पुदीना 
मशरूम
रताळे 
आले 
 
कृती-
सर्वात आधी कांद्याची पात, गाजर, लसूण, आले, मटार, बटाटा, पालक, मेथी, पुदिना, मशरूम आणि रताळे चिरून घ्यावे. नंतर हे सर्व फ्राय पॅनमध्ये ठेवावे. व हलकेसे फ्राय करून घ्यावे. आता थोडे मीठ घालून झाकण ठेवून शिजवून घ्यावे. वरून अर्धा चमचा व्हिनेगर घालावे. आता त्यात थोडे कॉर्न फ्लोअर घालून सर्वकाही चांगले शिजवून घ्यावे. आता त्यात २ ग्लास पाणी घालून हलके मीठ आणि मिरपूड घालून थोडे शिजवून घ्यावे. चवीसाठी वरून कोथिंबीर गार्निश करावी. तर चला तयार आहे आपले व्हेजिटेबल सूप रेसिपी, गरम नक्कीच सर्व्ह करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik