शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By
Last Modified: बुधवार, 27 नोव्हेंबर 2024 (08:00 IST)

Winter Special Recipe : हे दोन सूप नक्की ट्राय करा

Mung Dal soup
1.मूग डाळ सूप
साहित्य-
1 कप मूग डाळ 
1 छोटा चमचा हळद 
1 छोटा चमचा आले पेस्ट 
1 छोटा चमचा जिरे 
1 कांदा बारीक चिरलेला 
1 टोमॅटो बारीक चिरलेला 
चवीनुसार मीठ 
मिरेपूड 
1 चमचा तूप 
 
कृती-
सर्वात आधी मूग डाळ स्वच्छ धुवून साधारण 20 मिनिट पाण्यामध्ये भिजत घालावी. आता एका कढईमध्ये तूप घालून जिरे घालावे. आता यामध्ये आल्याची पेस्ट घालून परतवून घ्यावे. आता कांदा आणि टोमॅटो परतवून घ्यावा. तसेच आता यामध्ये मुगडाळ, हळद, मीठ, पाणी घालून उकळून घ्यावे. 
आता डाळ नरम झाल्यानंतर ती मिक्सरमधून बारीक करून घ्यावी. आता यामध्ये मिरे पूड घालावी. तर चला तयार आहे मूगडाळीचे सूप, गरम नक्कीच सर्व्ह करा. 
    
Broccoli Sopu
2.ब्रोकोली पालक सूप
साहित्य- 
1 ब्रोकोली
2 कप पालक  
1 कांदा बारीक चिरलेला 
1 छोटा चमचा आले पेस्ट 
1 चमचा तूप 
चवीनुसार मीठ 
मिरे पूड 
2 कप पाणी 
 
कृती- 
सर्वात आधी ब्रोकोली, पालक, कांदा, लसूण चिरून घ्यावे. आता एका पॅनमध्ये तूप घालून सर्व भाज्या घालून परतवून घ्यावे. यानंतर मीठ, मिरे पूड घालावी आणि पाणी घालावे. आता झाकण ठेऊन शिजवून घ्यावे. तसेच भाज्या नरम झाल्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस घालावा. तर चला तयार आहे पालक ब्रोकोली सूप, गरम नक्कीच सर्व्ह करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik