पुदिना सरबत
साहित्य: ताज्या पुदिन्याच्या पानांचा रस, चवीप्रमाणे मीठ, साखर, लिंबाचा रस, बर्फ, प्यायचा सोडा.
कृती: पुदिन्याच्या रसात मीठ, साखर, लिंबाचा रस घालून मिसळून घ्या. सर्व्ह करताना ग्लासाच्या तळात बर्फाचा चुरा घालून त्यावर रस घाला. अता हळू-हळू सोडा घाला. वर लिंबाच्या चकत्या कापून ग्लासाल खोचा. सजावटीसाठी पुदिन्याची पाने घाला.