गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दसरा
Written By

काय खरंच रावणाला दहा तोंडे होती?

दहा तोंडे म्हटले की डोळ्यासमोर रावण येतो. हे खरंय आहे का? काही विद्वान म्हणतात रावणाला दहा दहा नव्हे, तर एकच डोके होते, तो केवळ दहा तोंड असल्याचा भ्रम पैदा करायचा म्हणूनच त्याला दशानन म्हणायचे. काही लोकांप्रमाणे रावण सहा दर्शन आणि चार वेदांचा ज्ञाता होतो म्हणूनही त्याला दसकंठी म्हणायचे. दसकंठी प्रचलनात आल्यामुळे त्याला दहा तोंडे होती असे मानले गेले.
 
जैन शास्त्रांप्रमाणे रावणाच्या गळ्यात 9 मोठे मोठे गोलाकार मणी होते. त्या मण्यांमध्ये त्याचे तोंड दिसायचे ज्यामुळे त्याला दहा तोंडे असल्याचं भ्रम व्हायचं.
 
तसेच अनेक विद्वान आणि पुराणांप्रमाणे रावण एक मायावी व्यक्ती होता, आपल्या मायेने तो दहा तोंडे असल्याचं भ्रम पैदा करायचा. त्याच्या मायावी शक्तीचे आणि जादूचे चर्चे जगभरात प्रसिद्ध होते.
 
रावणाचे दहा तोंडे होण्याची चर्चा रामचरितमानसमध्ये आढळते. तो कृष्णपक्ष अमावास्येला युद्धासाठी निघाला होता आणि एक-एक दिवस एक-एक तोंड कापले जात होते. या प्रकारे दहाव्या दिवशी अर्थात शुक्लपक्षच्या दशमीला रावणाचे वध झाले. म्हणून दशमीला रावण दहन केलं जातं.
 
रामचरितमानसमध्ये वर्णित आहे की ज्या तोंडाला राम आपल्या बाणाने कापायचे पुन्हा त्या जागेवर दुसरं तोंड उत्पन्न व्हायचं. रावणाचे हे तोंड कृत्रिम होते- आसुरी मायेने बनलेले.