राजस्थानात 12 मंत्र्यांचे पानिपत
राजस्थानात वसुंधरा सरकारविरोधात असलेला जनादेश निवडणूक निकालानंतर उघड झाला असून, जरी वसुंधरा राजेंना जनतेने निवडून दिले असले तरी त्यांच्या 12 मंत्र्यांचे मात्र या निवडणुकांमध्ये पानिपत झाले आहे. विधानसभा अध्यक्ष सुमित्रा सिंह यांचाही समावेश आहे. त्यांना कॉग्रेसच्या रिता चौधरी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे राज्य सरकारचे गृह मंत्री अमरा राम, सिंचन मंत्री सांवरमल जाट, समाज कल्याण मंत्री मदन दिलावर, सहकार मंत्री नाथू सिंह गुर्जर, आणि महिला व बाल कल्याण मंत्री कनकमल कटारा यांचा पराभव झालेल्या नेत्यांमध्ये समावेश आहे. ग्रामीण विकास मंत्री कालूलाल गुर्जर, परिवहन मंत्री यूनुस खान राज्य मंत्री राम मेघावल आणि सुरेंद्र पाल, शहरी विकास मंत्री सुरेंद्र गोयल आणि क्रीडा मंत्री प्रताप सिंह सिंघवी यांचाही मोठ्या फरकाने पराभव झाल्याने भाजपाला धक्का बसला आहे.