मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. निवडणूक 08
Written By वेबदुनिया|

शीला, रमन व शिवराजना संधी, राजे माघारी

देशातील पाच प्रमुख राज्‍यांमध्‍ये झालेल्‍या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून अनपेक्षित लागलेल्‍या या निकालात कॉंग्रेसने आघाडी घेतली असून भाजपला आपली राजस्थानातील सत्ता गमवावी लागली आहे. तर मिझोरममध्‍येही तेथील सत्ताधारी पक्षाचा साफ पराभव झाला असून कॉंग्रेसने सत्ता मिळविली आहे.

राजस्‍थानात गेल्‍या पाच वर्षांपासून असलेली भाजपच्‍या वसुंधरा राजे यांची सत्ता उलथली आहे. तर दिल्लीत शीला दीक्षित यांनी हॅट्रिक बनविली आहे. तर मध्‍यप्रदेशात शिवराज सिंह चौहान व छत्तीसगढमध्‍ये रमण सिंह यांनी आपली सत्ता अबाधित ठेवण्‍यात यश मिळविले आहे. मिझोरममध्‍ये सत्ताधारी एमएनएफ पक्षाचा पूर्ण पराभव झाला असून कॉंग्रेसने स्‍पष्‍ट बहुमत मिळविले आहे.

राजस्थान- राजस्‍थानातील 200 जागांसाठी झालेल्‍या निवडणुकीत कॉंग्रेसने 96 जागा मिळविल्‍या असून त्‍यांना 40 जागांचा फायदा झाला आहे. तर सत्ताधारी भाजपला 78 जागा मिळाल्‍या असून 41 जागांचे नुकसान झाले आहे. इतर पक्षांनी 26 जागा मिळविल्‍या आहेत.

दिल्ली- दिल्‍लीच्‍या 70 जागांसाठी झालेल्‍या निवडणुकीत कॉंग्रेसने 42 जागा मिळविल्‍या आहेत. येथे त्‍यांना 4 जागांचे नुकसान झाले आहे. तर भाजपने 23 जागा मिळवून मागील वेळच्‍या तुलनेत 3 जागा अधिक मिळविल्‍या आहेत. तर इतर अपक्ष व पक्षांना 4 जागा मिळाल्‍या आहेत.

मध्यप्रदेश- येथे 230 पैकी भाजपने 145 जागा मिळविल्‍या आहेत. कॉंग्रेसने 69 जागा मिळविल्‍या आहेत. येथे कॉंग्रेसला 30 जागांचा फायदा झाला आहे. तर इतरांना 16 जागा मिळाल्‍या आहेत. शिवराज सिंह यांना आपली सत्ता कायम ठेवण्‍यात यश आले असून भाजपमधुन फुटून वेगळे निघालेल्‍या भारतीय जन शक्‍ती पक्षाच्‍या नेत्‍या उमा भारती यांची राजकीय कारकिर्दी संपुष्‍टात आली असून त्‍या स्‍वतः पराभूत झाल्‍या आहेत.

छत्तीसगड- मध्‍ये 90 जागांपैकी भाजपने 53 जागा मिळविल्‍या आहेत. तर कॉंग्रेसने 35 जागा मिळविल्‍या आहेत. इतरांना 2 जागा मिळाल्‍या आहेत.

मिझोरम- मध्‍ये सत्ताधारी मिझोरममध्‍ये सत्ताधारी एमएनएफ पक्षाचा पूर्ण पराभव झाला असून 40 जागांपैकी कॉंग्रेसला 32 जागा मिळाल्‍या असून सत्ताधारी एमएनएफ पक्षाने 3 जागा मिळविल्‍या आहेत. इतरांना 5 जागा मिळाल्‍या आहेत.