Last Modified: नागपूर , बुधवार, 16 जुलै 2008 (14:03 IST)
टिळक विद्यालयात साकारली 'वेबदुनिया'
WD
WD
स्वातंत्र्यपूर्व कालखंडात ज्या शाळेची मुहूर्तमेढ रोवली गेली त्या टिळक विद्यालयात बुधवारी (ता.१६) वेबदुनिया टिमने आपले प्रचार अभियान राबविले. यात पालक, विद्यार्थी, आणि शिक्षकांनी वेबदुनियाच्या विविध सदरांची ओळख करुन घेतली.
शहिद भगतसिंह सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला. सकाळी साडेदहा वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. यात ठळक बातम्या, क्रीडा, क्वेस्ट, मेल, ब्लॉग्ज विषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी प्रचारकांना विविध प्रश्न विचारले. श्वेता या सातव्या इयत्तेत शिकणार्या विद्यार्थिनीने उत्कृष्ठ प्रश्न विचारल्याबद्दल तिला वेबदुनियातर्फे एक कॅप भेट देण्यात आली. तर तन्मय आणि अजिंक्य या विद्यार्थ्यांनीही मेल आणि संकेतस्थळाबद्दल कल्पक प्रश्न विचारले. त्यांनाही वेबदुनियातर्फे भेट वस्तू देण्यात आली.
अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होत असल्याचे मत इंग्रजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदिती नाईक यांनी व्यक्त केले. वेबदुनिया म्हणजे माहितीचे मायाजाल असून गृहिणींसाठीही संकेतस्थळ उपयोगी असल्याचे त्या म्हणाल्या.