नागपुरात लॉ कॉलेज भागात प्रचार मोहिम
वेबदुनियातर्फे नागपूर शहरात विविध ठिकाणी प्रचार मोहिम राबवली जात आहे. याअंतर्गत सोमवारी (ता. १४) लॉ कॉलेज व सेनिनरी हिल्स येथे कार्यक्रम झाले. यावेळी वेबदुनियाचे स्टॉल्स या भागात लावण्यात आले होते. लॉ कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. विद्यार्थ्यांनी वेबदुनिया जाणून घेण्यात मोठी रूची दाखवली. वेबदुनियातील विविध विभाग आवडल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय वेबदुनियाच्या मेल, क्वेस्ट, क्लासिफाईड्स या सेवांबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले. सेमिनरी हिल्स भागातही वेबदुनियाच्या स्टॉल्सला अनेकांनी भेटी दिल्या. विविध स्तरातील नागरिकांनी वेबदुनिया जाणून घेण्यात उत्सुकता दर्शवली. वेबदुनियाच्या प्रचारकांनी त्यांना सर्व माहिती दिली.