मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. इव्हेंट वार्ता
Written By
Last Updated : गुरूवार, 7 जुलै 2016 (12:11 IST)

मराठी साहित्यकारांचे संमेलन 9-10 जुलैला

मराठी भाषा आणि संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी मध्यप्रेदशाच्या मराठी भाष्यी साहित्यकार, कलाकार आणि प्रतिष्ठित सामाजिक व सांस्कृतिक संस्थांच्या कार्यांना रेखांकित करण्याच्या उद्देश्याने मराठी साहित्य अकादमी द्वारे दोन दिवसीय अर्थात 9 आणि 10 जुलैला भरारी मराठी माणसाची- संमेलन रवींद्र भवन, भोपाळ येथे आयोजित करण्यात आले आहे.
 
विशेष अतिथीच्या रूपात लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे. ९ जुलै सायं ७.३० वाजे पासून साहित्य संगम- कवी संमेलन, कथाकथन, नाट्यवाचन (मध्यप्रदेशातील साहित्यकार कडून) आयोजित करण्यात आले असून दिनांक १० जुलै सकाळी ८.३० ते १०.३० पर्यंत- कलाकार संवाद, दुपारी ११ वा मुख्य कार्यक्रम, दुपारी ३.३० ते सायं ६.३० पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम - मध्यगूंज प्रस्तुत करण्यात येईल.