Daily Horoscope
✕

उपवासासाठी ५ प्रकारच्या सोप्या आणि चविष्ट चटण्या Easy Upvas Chutney Recipes

Updated: गुरूवार, 15 ऑक्टोबर 2026 (17:20 IST)
 
२. शेंगदाण्याची चटणी (किंवा आटवण)
साहित्य: १ वाटी भाजलेले शेंगदाणे (सोललेले), २ हिरव्या मिरच्या, १ चमचा दही, जिरे, सेंधव मीठ आणि साखर.
कृती: शेंगदाणे, मिरची, जिरे, मीठ आणि साखर एकत्र वाटून घ्या. घट्ट चटणी हवी असल्यास पाणी घालू नका; किंवा थोडे ताक/दही आणि पाणी घालून पातळ आमटीसारखी (आटवण) बनवून वरईच्या भातासोबत खाऊ शकता.
 
३. उपवासाची आंबट-गोड चिंच-खजूर चटणी
साहित्य: ५-६ खजूर (बिया काढलेले), २-३ चमचे चिंचेचा कोळ, ३-४ चमचे गूळ, थोडे जिरे पूड आणि सेंधव मीठ.
कृती: खजूर थोडे उकडून घ्या. त्यानंतर खजूर, चिंचेचा कोळ, गूळ, जिरे पूड आणि मीठ एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक पीसून घ्या. ही चटणी २-३ आठवडे फ्रिजमध्ये छान टिकते.
 
४. रताळ्याची चटणी
साहित्य: १ उकडलेले रताळे, २ हिरव्या मिरच्या, १/४ वाटी ओला नारळ, जिरे, सेंधव मीठ, लिंबाचा रस आणि साखर.
कृती: उकडलेले रताळे सोपवून त्याचे तुकडे करा. मिक्सरमध्ये रताळे, नारळ, मिरच्या, जिरे, मीठ आणि लिंबू रस एकत्र करून वाटून घ्या. ही चटणी अतिशय पौष्टिक आणि क्रीमी होते.
 
५. दही-पुदिन्याची चटणी
साहित्य: १ वाटी घट्ट दही, अर्धी वाटी पुदिना पाने, २ हिरव्या मिरच्या, जिरे पूड, सेंधव मीठ आणि १ चमचा साखर.
कृती: पुदिना आणि मिरच्या थोड्या पाण्यात वाटून घ्या. हे वाटण फेटलेल्या दह्यामध्ये मिसळा. वरून जिरे पूड, मीठ आणि साखर घालून एकत्र करा. उपवासाच्या भज्यांसोबत ही चटणी खूप छान लागते.
टीप: तुमच्याकडे उपवासाला कोथिंबीर, जिरे किंवा पुदिना खात नसतील, तर ते साहित्य आवडीनुसार वगळू शकता.
ALSO READ: बटाट्याचा कंटाळा आला असेल तर उपवासासाठी बनवा रताळ्याच्या कुरकुरीत टिक्की; चवीला अप्रतिम
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: उपवासाला बनवा राजगिऱ्याच्या पुऱ्या; छान फुगण्यासाठी महत्त्वाच्या या गोष्टी लक्षात ठेवा

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

रजोनिवृत्तीच्या आसपास हाडांची काळजी कशी घ्यावी? आहार आणि व्यायामाचे महत्त्व

Happy Dussehra Images 2026 दसरा शुभेच्छा मराठी इमेजेस

मुलींसाठी दुर्गा देवीची मॉडर्न यूनिक नावे, आयुष्यभर देवीचा आशीर्वाद मिळेल

नवरात्रीत मासिक पाळी आल्यास काय करावे? व्रत- पूजा या प्रकारे पूर्ण करावे

करंजी फुटू नये आणि सारण बाहेर येऊ नये म्हणून या ५ टिप्स वापरा

पुढील लेख
Show comments