सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. उपवासाचे पदार्थ
Written By

उपवासाची कचोरी

साहित्य: पावभर रताळी, दोन बटाटे, 1 वाटी खवलेले खोबरे, 5-6 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी बेदाणे, चिरलेली कोथिंबीर, मीठ, साखर.

 
कृती: उकडलेले रताळी व बटाटे मॅश करून त्यात मीठ घालावे. खोबरे, बेदाणे, मिरच्यांचे तुकडे, कोथिंबीर व मीठ घालून सारण तयार करावे. बटाटे आणि रताळ्याची पारी करून त्यात थोडे सारण भरून कचोर्‍या तयार कराव्यात. भगर किंवा शिंघाड्याच्या पिठात घोळवून तुपात तळाव्यात. चटणीबरोबर सर्व्ह करा.