गुरूवार, 4 डिसेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. उपवासाचे पदार्थ
Written By

नवरात्री स्पेशल: कुरकुरे आणि चविष्ट साबुदाण्याचे वडे

navratri special sabudana vada
साहित्य - मीडियम साइज साबुदाणा - 1 कप (150 ग्रॅम) भिजलेला, बटाटे - 5 (300 ग्राम) उकडलेले, दाण्याचा कूट ½ कप (100 ग्राम), कोथिंबीर - बारीक चिरलेला. शेंद मीठ चवीनुसार, हिरव्या मिरच्या - 2 (बारीक चिरलेल्या), आलं पेस्ट - 1 लहान चमचा, काळे मिरे - 8-10 (पूड) तेल - तळण्यासाठी: 
 
विधी - सर्वप्रथम 1 कप साबुदाण्याला 1 कप पाण्यात दोन तासासाठी भिजून ठेवा. बटाटे सोलून चांगल्या प्रकारे मॅश करून घ्या.  मॅश केलेल्या बटाट्यात साबुदाणा घालावा नंतर त्यात शेंदे मीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, आलं पेस्ट, तिखट, काळे मिरे पूड, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि दाण्याचा कूट घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. वडे बनवण्यासाठी मिश्रण तयार आहे. कढईत तेल घालून गरम करा. मिश्रणातून थोडे मिश्रण काढून गोल करून हाताने दाबून चपटे करावे, तयार वड्याला प्लेटमध्ये ठेवावे, या प्रकारे सर्व मिश्रणाचे वडे तयार करा. नंतर वडे तळून घ्यावे. साबूदाण्याचे चविष्ट वडे तयार आहे. गरमा गरम साबूदाण्याच्या वड्यांना हिरवी चटणी, गोड चटणी सोबत सर्व्ह करावे.