Daily Horoscope
✕

तोंडाला चव आणणाऱ्या उपवासाच्या भाज्या Vrat Special Vegetable Recipes

Updated: गुरूवार, 15 ऑक्टोबर 2026 (17:41 IST)
केळे घालून परतून घ्या. शेंगदाणे कूट आणि मीठ घाला. ३-४ मिनिटे शिजवा. कोथिंबीर टाका.
 
लोकप्रिय बटाट्याची सुकी भाजी 
साहित्य-
उकडलेले बटाटे – ३-४ मध्यम
तूप किंवा तेल – १-२ चमचे
जिरे – ½ चमचा
हिरवी मिरची – २-३ (बारीक चिरलेली)
भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट – २-३ चमचे
सैंधव मीठ – चवीनुसार
साखर – ½ चमचा (ऐच्छिक)
कोथिंबीर – थोडी
लिंबाचा रस – १ चमचा (ऐच्छिक)
 
कृती-
बटाटे उकडून सोलून मध्यम आकारात कापा. तूप गरम करून जिरे फोडा. हिरवी मिरची घाला. बटाटे घालून २-३ मिनिटे परतून घ्या. शेंगदाण्याचा कूट, मीठ, साखर घाला. चांगले मिसळा. शेवटी कोथिंबीर आणि लिंबाचा रस टाका. राजगिऱ्याच्या पुऱ्या, साबुदाणा खिचडी किंवा भगरीसोबत नक्कीच सर्व्ह करा.
 
रताळ्याची भाजी (स्वीट पोटॅटो)
साहित्य-
उकडलेली रताळी – ३-४
तूप – १ चमचा
जिरे – ½ चमचा
हिरवी मिरची – २-३
भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट – २-३ चमचे
सैंधव मीठ – चवीनुसार
साखर – ½-१ चमचा
कोथिंबीर आणि लिंबाचा रस
 
कृती- 
रताळी उकडून सोलून तुकडे करा. तूपात जिरे + मिरची फोडा. रताळी घालून थोडे परतून घ्या. शेंगदाणे कूट, मीठ, साखर घाला. ४-५ मिनिटे शिजवा. कोथिंबीर आणि लिंबाचा रस टाका. ही भाजी गोडसर आणि खमंग लागते.
ALSO READ: फक्त १० मिनिटांत तयार होणारी उपवासाची थालीपीठे; कमी साहित्यात चवदार नाश्ता
अतिरिक्त टिप्स
शेंगदाण्याचा कूट भाजीला चव आणि पोषण दोन्ही देतो. तूप वापरल्यास चव जास्त येते.
थोडीशी काळी मिरी किंवा आल्याचा ठेचा (उपवास परवानगी असल्यास) घालू शकता.
भाजी सोबत काकडीची कोशिंबीर (काकडी + सैंधव मीठ + जिरेपूड + कोथिंबीर) खूप छान लागते. या भाज्या राजगिऱ्याच्या पुऱ्या, साबुदाणा खिचडी, भगर किंवा थालीपीठ सोबत खा.  
ALSO READ: "नवरात्रीच्या उपवासासाठी साखरपाकाची खीर नको? बनवा मखान्याची स्वादिष्ट आणि पौष्टिक खीर''
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: उपवासासाठी ५ प्रकारच्या सोप्या आणि चविष्ट चटण्या Easy Upvas Chutney Recipes

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

नवरात्रीच्या उपवासात ॲसिडिटीचा त्रास होतोय? आराम मिळवण्यासाठी करा हे सोपे घरगुती उपाय

सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनमध्ये ३२७ पदांसाठी भरती, १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा

दिवाळीपूर्वी चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो हवा? त्वचेच्या प्रकारानुसार निवडा हे सोपे घरगुती उपाय

गरोदर महिलांसाठी पौष्टिक डाळी! आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी आहारात नक्की करा समावेश

जत्रेत किंवा बाजारात मुलाचा हात सुटला तर घाबरू नका! सुरक्षिततेसाठी लहान मुलांना आधीच शिकवा या महत्त्वाच्या गोष्टी

पुढील लेख
Show comments