जुन्या चिनी नाण्यांचा उपयोग पुरातन काळापासून वाईट बाबींना व रोगराईला दूर ठेवणा-या ताईताच्या स्वरूपात केला जात असे. फेंगशुईतील नाणी धातू तत्वाचे प्रतिनिधित्व करतात व संपत्तीचे प्रतीक असतात. तीन नाण्यांचा उपयोग ''आय चिंग'' ला वाचण्यासाठी केला जातो. यात एका बाजूला यीन दुस-या बाजूला यांग नाव देऊन टायग्राम्सच्या मदतीने वाचन केले जाते.