1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. फिफा विश्वचषक
Written By
Last Modified: शनिवार, 7 जुलै 2018 (16:57 IST)

ब्राझीलच्या पराभवानंतर नेमारला चाहत्यांनी केले ट्रोल

wrong for brazil
फुटबॉल वल्डकपमध्ये पाच वेळा विश्वविजेत्या असलेल्या ब्राझीलला २-१ अशा गोलफरकाने हरवून बेल्जियमने उपांत्य फेरीत प्रवेश केला. या पराभवाने ब्राझील फिफा विश्वचषकातून बाहेर पडले. बेल्जियमने 32 वर्षांनी उपांत्य फेरी गाठली आहे. यापूर्वी 1986 मध्ये उपांत्यपूर्व फेरीत पोहचले होते. 
 
दुसरीकडे ब्राझीलच्या पराभवानंतर कर्णधार नेमारला चाहत्यांनी ट्रोल केले आहे. सोशल मीडियावर ब्राझीलच्या संघाची खिल्ली उडवत फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. नेमारच्या अगोदर मेस्सी आणि रोनाल्डो या दिग्गज खेळाडूंच्या संघाला विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. लाडक्या खेळाडूंचे संघच बाहेर पडल्याने चाहते निराश झाले आहेत. त्यांनी आपला राग या खेळाडूंवर काढला. जेव्हा मेस्सीच्या अर्जेंटीनाला आणि रोनाल्डोच्या पोर्तुगालला पराभवाचा धक्का बसला तेव्हा दोघांवरही चाहत्यांनी जोरदार टीका केली होती. आता नेमारलासुद्धा चाहत्यांनी सोशल मीडियावरुन सुनावले आहे. नेमारच्या मैदानावर मुद्दाम पडण्याच्या स्टाईलचीही चाहत्यांनी खिल्ली उडवली आहे. नेमारची स्टाईलची खिल्ली उडवणारे व्हिडिओही शेअर केले आहेत.