शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. चित्रपट समीक्षा
Written By
Last Modified: शनिवार, 21 मे 2016 (14:33 IST)

Movie Review:इमोशनल करून देते 'सरबजीत'ची कथा

कथा...
ही कथा भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरवर पंजाबमध्ये राहणार्‍या सरबजीत सिंह (रणदीप हुड्डा)ची आहे, ज्याला कबूतर, रेसलिंग आणि राजेश खन्नाशी फार प्रेम होत. सरबजीत आपली बायको सुखप्रीत कौर (ऋचा चड्ढा)शी फार प्रेम करत होता. सरबजीतची एक बहीण दलबीर कौर पण (ऐश्वर्या राय बच्चन) आहे, एक दिवशी अचानक सरबजीत गायब होतो ज्याची तक्रार दलबीर पंचायतमध्ये करते, पण त्याचा काहीच पत्ता लागत नाही. मग कथेत पाकिस्तानच्या तुरुंगात कैद सरबजीतला दाखवण्यात येत ज्याला पाकिस्तानी सेनेचे लोक सीमा ओलांडून आल्याने त्याला अटक करून घेऊन जातात. सरबजीतच्या सुटकेसाठी दलबीर पाकिस्तान जाते, पण तिथे तिला ते काही जमत नाही. यानंतर सुरू होत सिस्टमच्या विरुद्ध लढाई जी दोन्ही देशांमध्ये हालचाल मचावते.
 
डायरेक्शन...
चित्रपटाचे डायरेक्शन आणि आर्ट वर्क फारच छान आहे, प्रत्येक बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. जेलचे सीक्वेंस, पहिल्यांदा दलबीर आणि सरबजीतची तुरुंगात भेट, हे असे दृश्य आहे जे तुम्हाला नक्कीच इमोशनल करून देतील. चित्रपटाची कथातर जास्त करून प्रेक्षकांना माहीतच आहे. शूटिंग दरम्यान डायरेक्टरने रियालिटीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला आहे, कुठे कुठे चित्रपटात ड्रामा जास्त दिसून पडतो ज्याला कनेक्ट करणे थोडे मुष्किल होत.  
 
स्टार कास्टची परफॉर्मेंस...
चित्रपटात सर्वात छान काम रणदीपने केले आहे, त्याची बॉडी लँग्वेज आणि स्क्रीन अपियरेंसने स्पष्ट कळत की त्याने या चित्रपटासाठी किती मेहनत घेतली आहे. ऐश्वर्याचे कामही फारच छान असून तिचे डी-ग्लॅम लुकपण तारीफ करण्यासारखे आहे. चित्रपटात ऋचा, दर्शन कुमार आणि बाकी एक्टर्सने देखील छान काम केले आहे.  
 
चित्रपटाचे म्युझिक...
चित्रपटाचे म्युझिक उत्तम आहे. तुम्हाला प्रत्येक प्रकारचे साँग या चित्रपटात ऐकायला मिळतील जे कथेला मॅच करणारे आहे.  
 
बघावे की नाही ...
जर तुम्हाला सरबजीतच्या कथेला अजून जवळून जाणून घ्यायची इच्छा असेल तर हे चित्रपट नक्की एकदातरी बघा. रणदीप हुड्डा आणि ऐश्वर्या राय बच्चनच्या अॅक्टिंगसाठी देखील हे चित्रपट मस्ट वॉच आहे.