बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. फ्रेंडशिप डे
Written By

मैत्रिणी माझ्या किती किती गोड...

मैत्रिणी माझ्या अशा 
गुलाबाच्या पाकळ्या जश्या
सहवासाच्या अलगद स्पर्शाने
आनंद देऊन जाई कशा 
 
मैत्रिणी माझ्या 
किती किती गोड
भेटायची त्यांना सदैव
लागते ओढ 
 
मैत्रिणी माझ्या 
हुशार बाई
फिरकी हसत माझी 
घेत राही
 
मैत्रिणी माझ्या 
रेशमी धागा
मनात त्यांच्या प्रेमाची
राखीव जागा 
 
माझ्या मैत्रिणी म्हणजे
माझ्या आयुष्याचा ठेवा
कधीच येऊ देणार नाही
मैत्रीत दुरावा
माझ्या सर्व सखीं साठी....