शुक्रवार, 26 डिसेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. फ्रेंडशिप डे
Written By
Last Modified: शनिवार, 31 जुलै 2021 (16:27 IST)

मैत्री मध्ये होते आठवणींची साठवण

friendship day
मैत्री मध्ये होते आठवणींची साठवण,
कधीही कुठं ही मोकळं करता येतं मन,
आपण कोण काय?हे वेगळ्याने सांगावं लागत नाही,
मैत्री मधे "नाटक"कधी करावं लागतं नाही,
इतकी सहजता कुठं ही अन्य नाहीच शक्य,
अडचणी सोडवणं खऱ्या मित्रास नाही अशक्य,
औपचारिकतेला वाव नाहीच हो मुळी,
एकाच फांदी वरचे असतात सगळे, नाहीत वेगळी!
निरस होईल बघा ही दुनिया, मैत्री विना,
जिवंत पणे खळखळून जगण्याचा हा परवाना!!
....अश्विनी थत्ते