बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. फ्रेंडशिप डे
Written By
Last Updated : रविवार, 7 ऑगस्ट 2022 (10:17 IST)

Friendship Day Wishes In Marathi मैत्री दिनाच्या शुभेच्छा

Friendship day wishes
जन्म हा थेंबासारखा असतो
आयुष्य ओळीसारखं असतं
प्रेम त्रिकोणासारखं असतं
मैत्री मात्र वर्तुळासारखी असते
कारण, मैत्रीला शेवट नसतो
मैत्री दिनाच्या शुभेच्छा
 
मैत्रीचे बंध कधीच नसतात तुटणारे 
जुन्या आठवणींना उजाळा देत गालातल्या गालात हसणारे
मैत्री दिनाच्या शुभेच्छा
 
मैत्री ही कृष्ण आणि सुदाम्यासारखी असावी
एकाने गरीबीतही स्वतःचा  कधीच स्वाभिमान सोडला नाही
आणि दुसऱ्याने श्रीमंतीचा कधीच अभिमान केला नाही.
 
जिथे बोलण्यासाठी शब्दाची गरज नसते,
दुःख व्यक्त करण्यासाठी आसवांची  गरज नसते त्यालाच मैत्री म्हणतात
मैत्री दिनाच्या शुभेच्छा
 
जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत
राहील
एकत्र नसलो तरी सुगंध मैत्रीचा दरवरळत राहील
कितीही दूर जरी गेलो तरी
मैत्रीचे हे नाते
आज आहे तसेच उद्या राहील…
मैत्री दिनाच्या शुभेच्छा
 
आपला तर कोणी मित्र नाही
जे आहेत ते सगळे काळजाचे तुकडे आहेत
मैत्री दिनाच्या शुभेच्छा
 
दोस्ती कधी स्पेशल लोकांसोबत होत नाही
ज्याच्यासोबत होते तेच स्पेशल होऊन जातात
मैत्री दिनाच्या शुभेच्छा
 
जेव्हा कुणी हात
आणि साथ
दोन्ही सोडून
देतं…
तेव्हा बोट पकडून रस्ता
दाखवणारी
व्यक्ती म्हणजे
मैत्री.
मैत्री दिनाच्या शुभेच्छा
 
मित्राचा राग आला तरी
त्यांना सोडता येत नाही ,
कारण दुःखात असो किंवा सुखात 
ते कधीच आपल्याला ऐकटे सोडत नाही…
मैत्री दिनाच्या शुभेच्छा
 
देव ज्यांना रक्ताच्या 
नात्यात जोडायला विसरतो
त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो.
मैत्री दिनाच्या शुभेच्छा