एक मित्र तरी असावा
मैत्र नावाचा सुखद गारवा असावा,
रणरणत्या ऊन्हात तोच सोबतीला हवा,
परिस्थिती चे कित्तीतरी झेलावे लागतात झटके,
मित्रासमोर मोकळं झालं की वाटे हलके,
सर्व जगापासून लपवू, काही गोष्टी आपण,
सखा सोबतीला, त्यापासून का लपवायचे पण?
एकाच स्तरावर असतो, तो अन मी,
जगाशी लढू शकतो मग मिळून आम्ही!
एवढा विश्वास त्याच्याच नावात असतो,
म्हणून एक मित्र तरी असावा असं मनापासून म्हणतो!
..अश्विनी थत्ते