1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गजानन महाराज शेगाव
Written By
Last Modified: मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023 (18:25 IST)

शेगावी प्रकटण्यापूर्वी गजानन महाराजांनी घेतली होती स्वामी समर्थांची भेट

Shri Gajanan Maharaj Vijay Granth Adhyay 1
गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक संत होते. महाराष्ट्रातील शेगाव हे स्थान गजानन महाराजांमुळे नावारूपाला आले आहे. गजानन महाराज माघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी अर्थातच शके 1800 म्हणजेच 23 फेब्रुवारी 1878 रोजी सर्वप्रथम शेगावात प्रकटले. या दिवशी सुमारे 30 वर्षाचे गजानन महाराज दिगंबरावस्थेत प्रथम दृष्टीस पडले.भक्त ही तिथी गजानन महाराज प्रकट दिन म्हणून साजरी करतात.“गण गण गणात बोते” हा त्यांचा आवडता मंत्र ज्याचा ते अखंड ते जप करित असे. त्यांनी 12 वर्षे तपश्चर्या केली. 
 
असे म्हणतात की एके दिवस बाल दिगंबर अवस्थेतील गजानन महाराज अक्कलकोट स्वामी समर्थांच्या भेटीसाठी निघाले. स्वामी समर्थ एके दिवशी खूप आनंदात होते. माझा गणपती आज येणार असे ते म्हणत होते. दुपारच्या वेळी गजानन महाराज अक्कलकोटला स्वामी समर्थाच्या आश्रमात पोहचले. त्या वेळी स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांना उपदेश करीत असताना त्यांनी बाल गजानन यांना बघतातच त्यांना ओळखून त्यांच्याकडे धावत जाऊन त्यांना मिठी मारली.त्यांनी गजानन महाराजांना सिध्दपुरुष होण्याचा आशिर्वाद दिला. स्वामी महाराजांना ''बाबा "म्हणायचे काही दिवस  गजानन महाराजांनी स्वामींच्या आश्रमी त्यांच्या सानिध्यात राहिले. अशा प्रकारे स्वामींनी बाल गजानन यांना आध्यात्मिक ज्ञानाचे धडे दिले आणि नंतर त्यांना नाशिकला देव मामलेदारांकडे जाण्यास सांगितले व त्यानंतर आकोटला नरसिंग महाराजाकडे आणि तेथून शेगावला जाऊन भक्तांचा उध्दार करावा व तेथेच देह सोडावा असे सांगितले.
 
स्वामींच्या आदेशानुसार, गजानन महाराज नाशिकला मामलेदारांचा भेटीला गेले संत मामलेदारांनी गजानन महाराजांना स्वामींच्या आदेशाची आठवण करून त्यांना शेगावला जाण्यास सांगितले आणि देह त्याग केला.
 
गजानन महाराज तिथून कावनाई गावात कपिलधारा तीर्थावर येऊन तिथे तपश्चर्या केली. तिथे त्यांना संत रघुनाथदास यांनी योगसिद्धी दिली. नंतर गजानन महाराज नाशिकात आले त्यावेळी तिथे संत मेळावा भरला होता. या मेळाव्यात विदर्भातील लाड कारंजा गावातील बाळशास्त्री गाडगे आलेले होते. त्यांची भेट झाली गाडगे यांनी गजानन महाराजांना आपल्या घरी लाड कारंजाला आदरातिथ्याने बोलाविले. लाड कारंजा आल्यावर गजानन महाराजांच्या दर्शनासाठी अफाट गर्दी होऊ लागली. 
 
बाळशास्त्री यांच्या कडून निरोप घेऊन ते बग्गी जावरा गावात मणिरामबाबाना येऊन भेटले आणि तिथे 4-5 दिवस मुक्काम केला. दोघांमध्ये अध्यात्मिक चर्चा झाली. मणिरामबाबांनी गजानन महाराजांची आठवण म्हणून गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली. आणि गजानन महाराजांना आकोटला नरसिंग महाराजांकडे जाण्याची आठवण करून दिली. गजानन महाराज नरसिंग महाराजांना आकोट येऊन भेटले.मी अक्कलकोटचे स्वामी समर्थ  यांच्या आज्ञेनुसार मी इथे आपणांस भेटावयास आलो आहोत. या वरून नरसिंग महाराजांनी गजानन महाराजांना ते समाधी घेत असल्याचे सांगितले आणि त्यापूर्वी त्यांना अष्टसिद्धी प्राप्ती दिली. नरसिंग महाराजांनी समाधी घेतल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार विधी आटपून शेगावला भक्तांच्या उद्धारासाठी शेगावला आले.     
 
शेगावात त्यांनी भक्तांचा उद्धार केला. तेथे घडलेल्या अनेक गोष्टींचा उल्लेख दासगणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथ यात आढळून येतो. शेगावात त्यांनी भक्तांचा उद्धार केला. तेथे घडलेल्या अनेक गोष्टींचा उल्लेख दासगणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथ यात आढळून येतो. आपल्या अवतारकार्यातील 32 वर्षांचा काळ त्यांनी शेगावात तसेच भ्रमंती करत इतर गावात व्यतीत केला.
 
नंतर जेव्हा अवतार समाप्तीची वेळ आली आहे तेव्हा त्यांनी हरी पाटलासोबत पंढरीला जाऊन देवाकडे विरह सहन होत नसल्याचे म्हटले. त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले. ऋषिपंचमीचा पुण्यदिनी ही त्यांनी भक्त हजर असताना समाधी घेतली. समाधी घेण्यापूर्वी महाराजांना सुवासिक द्रव्ये लावून अभ्यंग स्नान घालण्यात आले होते तसेच सुवासिनींनी त्यांची पूजा करून मंगलारती ओवाळली.
 
महाराजांनी 8 सप्टेंबर 1910 रोजी ऋषिपंचमीच्या दिवशी शेगाव येथे समाधी घेतली. म्हणून महाराजांचे भक्त ऋषीपंचमी हा दिवस त्यांची पुण्यतिथी म्हणून पाळतात.
 
 
Edited By - Priya Dixit