रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By
Last Updated : सोमवार, 18 सप्टेंबर 2023 (16:47 IST)

Ganesh Chaturthi 2023 : गणेशोत्सवाची सुरुवात कशी झाली, गणेशोत्सवाचा इतिहास जाणून घ्या

ganesha
Ganesh Chaturthi 2023 : आपल्या लाडक्या बाप्पाचा सण जवळ येत आहे. गणांवर प्रभुत्व असलेल्या श्री गणेशाची सर्व प्रथम पूजा केली जाते. कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यापूर्वी श्रीगणेशाची पूजा केली जाते आणि त्यानंतर इतर देवी-देवतांची पूजा केली जाते. आणि कोणत्याही मंगल शुभ विधीपूर्वी भगवान गणेशाची पूजा केली जाते कारण बाप्पाला सर्व संकटे दूर करणारा विघ्नहर्ता म्हणतात. लोक कल्याण करणे हे बाप्पाचे उद्दिष्ट आहे.

बाप्पा सर्व कार्यांना निर्विघ्नपणे पूर्ण करण्याचं कार्य करतात. रिद्धी-सिद्धीचा स्वामी गणेश आहे. आणि त्याच्या कृपेने संपत्ती आणि समृद्धीची कधीही कमतरता होत नाही. आणि यावर्षी गणेश चतुर्थीचा उत्सव भाद्रपद चतुर्थी 19 सप्टेंबर रोजी होईल, जिथे गणपतीची स्थापना केली जाईल. शेतकरी गणपतीची पूजा केली जाते आणि हा उत्सव 11 दिवस चालतो.घरोघरी आणि मंडपोमंडपी येणारा हा बाप्पा येतांना सर्वत्र आनंदाचे उत्साहाचे वातावरण घेउन येतो.
 
त्याच्या आगमनापुर्वीपासुनच कितीतरी दिवस आधीपासुन तयारी सुरू होते. प्रत्येक जण आपल्या पंरपंरेप्रमाणे त्याची पुजा अर्चना करतात.कुठे बाप्पा संपुर्ण दहा दिवस, कुठे पाच दिवस, कुठे दिड दिवस तर कुठे अगदी एक दिवसाकरीता देखील येतो.
 
ज्योतिषशास्त्रात देव, मानव आणि दानव या तीन गणांचे वर्णन आहे. देवलोक, भूलोक आणि दानलोकात गणपती पूजनीय आहे. गणपती ब्रह्मस्वरूपात असून त्यांच्या पोटात सर्व काही सामावलेले आहे. आणि हे तिन्ही जग त्याच्या पोटात सामावलेले असल्यामुळे त्याला लंबोदर म्हणतात आणि गणपतीमध्ये सर्वकाही पचवण्याची क्षमता आहे. लंबोदर असणे म्हणजे त्यांच्या पोटात जे जाते ते तिथून बाहेर पडत नाही. गणपती हे लंबोदर म्हणवले जाते.   
 
गणेशाची कथा -
एकदा माता पार्वतीला स्नानासाठी जायचे असतांना बाहेर कुणी पहारेकरी नसल्याने तिने  मातीची एक मुर्ती बनवुन त्यात प्राण फुंकले त्याला पहारेकरी नेमुन ती स्नानाला गेली असता बाहेर भगवान शंकर आले.
त्यांना बाळ पहारेकऱ्याने रोखले आणि महालात प्रवेश देण्यास मनाई केली. भगवान शंकर आणि बाळ गणेशामध्ये युद्ध सुरु झाले. आणि त्यात भगवान शंकराने बाळ गणेशाचे संतापून शिरविच्छेद केले. 
 
माता पार्वती स्नानाहुन आल्यानंतर झालेल्या प्रकाराने प्रचंड संतापल्या आणि क्रोधीत झाल्या त्याने शंकराला बाळ गणेशाला पुन्हा जिवंत करण्याचे सांगितले. माता पार्वतीचा क्रोध शांत करण्यासाठी भगवान शंकराने आपल्या सेवकांना प्रथम जे कोणी दिसेल त्याचे शिर आणावयास सांगितले सेवक हत्तीच्या बाळाचे शिर घेउन आले असता ते शिर त्या धडावर बसविण्यात आले.तो दिवस भाद्रपद महिन्यातला शुध्द चतुर्थीचा दिवस होता आणि तेंव्हापासुन श्री गणेशाचा उत्सव साजरा करण्याची  प्रथा सुरू झाली.भगवान गणेशाला दुर्वा प्रिय असल्याने त्यांच्या शिरावर दुर्वा वाहाण्याची प्रथा आहे.त्याचप्रमाणे त्यांना मोदक आवडत असल्याने गणेशाला मोदकांचा नैवेद्य दिला जातो. 
 
गणेश महोत्सवाचा इतिहास-
गणेश चतुर्थीच्या उत्सवाची पूजा केव्हा सुरू झाली याची नेमकी तारीख कोणालाच माहीत नाही, तथापि इतिहासानुसार, गणेश चतुर्थी हा सार्वजनिक उत्सव म्हणून छत्रपती शिवाजी (मराठा साम्राज्याचे संस्थापक) यांच्या काळात  1630-1680  मध्ये सुरू झाल्याचा अंदाज आहे.पुढे छत्रपती शिवरायांनी पुण्यात हा उत्सव सुरू केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला. या महोत्सवातून त्यांनी लोकांमध्ये जनजागृती केली. यानंतर पेशव्यांनीही गणपती महोत्सवाचा क्रम पुढे नेला. गणपती  हे त्यांचे कुलदैवत होते, त्यामुळे तेही मोठ्या उत्साहाने गणेशाची पूजा करायचे. पेशवाईच्या समाप्तीनंतर, हा एक कौटुंबिक उत्सव राहिला, तो 1893 मध्ये बाळ गंगाधर लोकमान्य टिळक (एक भारतीय स्वातंत्र्य सेनानी आणि समाजसुधारक) यांनी पुनरुज्जीवित केला
 
त्यांनी श्री गणेशजींना लोकांचे देव असे संबोधले. लोकांनी ते मोठ्या उत्साहाने स्वीकारले, त्यानंतर गणेशोत्सव हे जनआंदोलनाचे माध्यम बनले. त्यांनी या उत्सवाला लोकांशी जोडून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जनजागरण करण्याचे माध्यम बनवले आणि त्यात ते यशस्वीही झाले. आजही संपूर्ण महाराष्ट्र हा या उत्सवाचा केंद्रबिंदू आहे आणि हा उत्सव लोकांना जोडतो.या उद्धेशाने हा सण सुरु करण्यात आला. गणपती उत्सव माणसांना एका धाग्यात जोडतो. 
 
या काळात रोज सकाळी व संध्याकाळी त्याच्यापुढे आरती म्हटली जाते. मोदकाचा प्रसाद दिला जातो. अकरा दिवसांनी म्हणजे अनंत चतुर्थीला मूर्तीचे नदीत किंवा तलावात विसर्जन केले जाते. 1892 साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी हा गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करायला सुरवात केली.
 
पारतंत्र्याचा काळ असल्याने लोकांनी एकत्र यावे, त्यांच्यात जागृती निर्माण व्हवी हा हेतु त्यामागे होता. सरदार खाजगीवाले यांनी सर्वात प्रथम गणेशोत्सव ग्वाल्हेरला साजरा केला. गणपत घोवडेकर, भाऊ वैद्य, भाऊ रंगारी यांनी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठपना करुन हा उत्सव साजरा केला.
 
हे पाहून टिळक यांनी पुण्यात केसरीवाड्‌यात सार्वजनिक स्वरुपात गणेशोत्सवाची सुरुवात केली. गणेश चतुर्थीला गणपतीची प्रतिष्ठापना केल्यानंतर काही लोक दीड दिवसांनी, काही पाच, सात किंवा अकराव्या दिवशी गणपतीचे विसर्जन करतात.
 
 गणेशोत्सवाचे महत्त्व-
भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी गणपती महाराजांच्या स्थापनेपासून ते चतुर्दशीच्या विसर्जनापर्यंत, गणपती जी विविध रूपात संपूर्ण देशात विराजमान असतात. त्याला मोदक तर आवडतातच, पण तो गणपती अकिंचनचाही आदर करतो, म्हणून त्याला दुर्वा आणि नैवेद्यही तितकेच प्रिय आहेत. या सणामुळे किती तरी हातांना रोजगार मिळतो. 
 
सर्वांना सोबत घेऊन जाणारे आपल्या धर्माचे आणि संस्कृतीचेही दर्शन या सणातून होते. सामाजिक एकोपा वाढवुन चांगल्या विचारांची देवाण घेवाण करणे, गरजवंताना सहाय्य करणे, विविध स्पर्धाचे आयोजन करून लोकांमधील चांगल्या गुणांचा प्रचार होण्यासाठी गंणेशोत्सव साजरा केला जातो. 
 
महाराष्ट्रातील मुंबईत या गणेशोत्सवाला एक आगळे वेगळे महत्त्व आहे. इथे गणपतीच्या मोठ्या मोठ्या मुर्त्या बसवतात. सार्वजनिक मंडळे या काळात आकर्षक देखावे उभारतात.यात ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक देखावे असतात.मुंबईतील लालबागाच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी लांबवरून लोक येतात. हा नवसाला पावणारा गणपती आहे. 
 
गणपतीची मूर्ती निवडताना हे नियम लक्षात ठेवा-
मूर्ती शक्यतो बसलेली असावी एक ते दीड फुटांपेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी ...
एकदंत, चतुर्भुज, पाश आणि अंकुश धारण करणारा ...
मुर्तीचे हात, पाय, डोळे, कान सुबक असावे ...
चित्रविचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नये 
गणेशाची मूर्ती सुंदर, मोहक आणि सुबक असावी. 
 
अनंत चतुर्दशी च्या दिवशी वाजत गाजत मिरवणूक काढून गणपतींच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते.



Edited by - Priya Dixit