गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश चतुर्थी 2023
Written By
Last Updated : बुधवार, 27 सप्टेंबर 2023 (12:30 IST)

Ganeshotsav 2023: गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या दणदणाटाने दोघांचा मृत्यू

death
Ganeshotsav 2023:सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम आहे. गणेशोत्सवाचा आज नववा दिवस आहे. 10 दिवस साजरा केला जाणाऱ्या या उत्सवात लहान मोठे असो आनंदाने भाग घेतात. ठिकठिकाणी सातव्या दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले आहे. डीजेच्या दणक्यात गणपती विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे अनेकांना त्रास होतो. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे दोन जणांचा जीव गेल्याची दोन घटना घडल्या आहे. पहिली घटना सांगलीच्या कवठेएकंद या ठिकाणी घडली आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे शेखर सुखदेव पावशे (32) तरुणाचा मृत्यू झाला आहे.    

मयत शेखर पावशे यांचा हृदयरोगाचे निदान झाल्यामुळे नुकतीच अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. घरातील सदस्यांनी त्याला जाऊ नको सांगून देखील तो मिरवणुकीत गेला. गावात डीजे लावून गणपती विसर्जनाची मिरवणूक काढत असताना डीजेच्या  दणदणाटाने शेखरला रात्री अस्वस्थ वाटू लागले आणि तो कसाबसा घरी आला आणि घरातच कोसळून पडला आणि बेशुद्ध झाला. त्याला तातडीनं रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. 
 
दुसरी घटना बोरगाव दुधारीतील वाळवा येथे घडली. प्रवीण यशवंत शिरतोडे(३५) हा तरुण सेंट्रिंगचे व्यवसाय करत असून सोमवारी कामावरून घरी गेल्यावर गावात निघणाऱ्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत गेला. मिरवणुकीत डीजेचा मोठा आवाज दणाणत होता. त्याला मिरवणुकीत अस्वस्थता जाणवू लागली असून नाचत असताना खाली कोसळला. त्याला तातडीनं रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला. 
 
Edited by - Priya Dixit