शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश चतुर्थी 2023
Written By
Last Modified: शनिवार, 23 सप्टेंबर 2023 (16:10 IST)

Jyeshtha Gauri Visarjan 2023 ज्येष्ठागौरी विसर्जन शुभ मुहूर्त

gauri pujan 2023
Jyeshtha Gauri Visarjan 2023 पुराणात सांगितल्याप्रमाणे आणि परंपरेनुसार प्रत्येक कार्यांच्या सुरुवातीला सर्वप्रथम गणपतीची पूजा केली जाते. सर्वप्रथम गणेशाची पूजा केल्यानंतरच इतर देव -देवतांची पूजा केली जाते. गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना केल्यानंतर मन वाट बघत असतं गौरीच्या आगमनाचे. दहा दिवसांच्या गणेशोत्सवात गौरीचीही पूजा केली जाते. यंदा 19  सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून षष्ठी म्हणजेच 21 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाईल. यानंतर सप्तमीला पूजन तर अष्टमीच्या दिवशी म्हणजेच 23 सप्टेंबरला गौर विसर्जन केले जाईल.
 
23 सप्टेंबर म्हणजे आज पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन केले जाणार आहे. विसर्जनासाठी सकाळी 6.11 ते 7.40 हा मुहूर्त चांगला आहे. तर त्यानंतर सकाळी 9.12 ते 10. 40   या मुहूर्तावर तुम्ही बाप्पाचे विसर्जन करु शकतात. दुपारी 1.43  ते रात्री 7.24 हा मुहूर्त बाप्पाला निरोप देण्यासाठी चांगला आहे. तर रात्री 10.44  ते 12 .12  मध्ये बाप्पाचे विसर्जन तुम्ही करु शकता.