मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : शुक्रवार, 25 ऑगस्ट 2023 (08:20 IST)

Varalakshmi Vrat 2023 आज वरलक्ष्मीव्रत, शुभ मुहूर्त, पूजा विधी, कथा आणि महत्व जाणून घ्या

Varalakshmi Vrat 2023
Varalakshmi Vrat 2023 Date, Shubh Muhurat, Puja Vidhi Mahatva हिंदू धर्मात अनेक व्रत-वैकल्ये सांगितले आहेत. वरलक्ष्मी व्रत हे या व्रतांपैकी एक आहे. हे व्रत लक्ष्मीला समर्पित आहे. हे व्रत वरदान देणारे मानले जाते. असे म्हणतात की जो व्रत भक्तीने वरलक्ष्मीची पूजा करतो त्याला धन, ऐश्वर्य, वैभव, संतती, सुख, सौभाग्य प्राप्त होते. वरलक्ष्मी व्रताच्या दिवशी स्त्रिया आपल्या पती, मुले आणि कुटुंबाच्या मंगलकार्यासाठी दिवसभर उपवास करून लक्ष्मीची पूजा करतात.
 
वरलक्ष्मी व्रत 2023 तिथी (Varalakshmi Vrat 2023 Date) 
वरलक्ष्मी व्रत तिथी आरंभ: 24 ऑगस्ट गुरुवार, सकाळी 5 वाजून 55 मिनिटांपासून
वरलक्ष्मी व्रत तिथी समापन : 25 ऑगस्ट शुक्रवार, संध्याकाळी 6 वाजून 50 मिनिटापर्यंत
अशात सूर्योदयाप्रमाणे वरलक्ष्मी व्रत 25 ऑगस्ट रोजी ठेवले जाईल.
 
वरलक्ष्मी व्रत 2023 शुभ मुहूर्त (Varalakshmi Vrat 2023 Shubh Muhurat) 
सिंह लग्न पूजा मुहूर्त: सकाळी 5 वाजून 55 मिनिटापासून ते 7 वाजून 42 मिनिटे
वृश्चिक लग्न पूजा मुहूर्त: दुपारी 12 वाजून 17 मिनिटापासून ते 2 वाजून 36 मिनिटे
कुम्भ लग्न पूजा मुहूर्त: संध्याकाळी 6 वाजून 22 मिनिटापासून ते रात्री 7 वाजून 50 मिनिटे 
वृषभ लग्न पूजा मुहूर्त: रात्री 10 वाजून 50 मिनिटापासून ते 12 वाजून 45 मिनिटे
 
वरलक्ष्मी व्रत 2023 दोन शुभ योग
25 ऑगस्टला दोन शुभ योग तयार होत आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्धि योग सकाळी 05 वाजून 55 मिनिटापासून ते सकाळी 09 वाजून 14 मिनिटापर्यंत राहील. तर रवि योग सकाळी 09 वाजून 14 मिनिटापासून ते 26 ऑगस्ट शनिवारी सकाळी 05 वाजून 56 मिनिटापर्यंत राहील.
 
वरलक्ष्मी व्रत 2023 पूजा विधी (Varalakshmi Vrat 2023 Puja Vidhi)
वरलक्ष्मी व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे.
गंगाजल शिंपडून पूजास्थान शुद्ध आणि पवित्र करावे.
वरलक्ष्मीचे ध्यान करताना व्रत ठेवण्याचा संकल्प करा.
घराच्या ईशान्य दिशेला मंडप घालून लाकडीच्या चौरंगावर लाल रंगाचा स्वच्छ कापड पसरवा.
त्यावर तांदळाच्या वर पाण्याने भरलेला कलश ठेवा.
लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा.
मातेच्या मंत्रांचा जप करावा.
माता लक्ष्मीला पुष्प, नारळ, हळद, कुंकुम, माळा अर्पण करा.
वरलक्ष्मीला शृंगार अर्पण करा. 
देवीला एकवीस अपपूंचा नैवेद्य दाखवावा.
धूप आणि तुपाचा दिवा लावून वरलक्ष्मी मातेची प्रार्थना करा.
पूजेनंतर वरलक्ष्मी व्रत कथा अवश्य पाठ करा.
आरती संपल्यावर सर्वांना प्रसादाचे वाटप करावे.
पूजेला आलेल्या सर्व स्त्रिया, ब्राह्मणांना वाण द्यावे.
 
वरलक्ष्मी व्रत 2023 महत्व (Varalakshmi Vrat 2023 Mahatva) 
वरलक्ष्मी व्रत केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि दांपत्य जीवन सुखी राहतं.
वरलक्ष्मी देवी लक्ष्मीचं एक स्वरूप आहे.
वरलक्ष्मी व्रत केल्याने अष्ट सिद्धी आणि महालक्ष्मीचं वरदान प्राप्त होतं.
हे व्रत केल्याने घरावर देवी लक्ष्मीची कृपा राहते.