गणेश विसर्जन 2024 शुभ मुहूर्त आणि बाप्पाला निरोप देण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
गणेश विसर्जन शुभ मुहूर्त
पूजेचा मुहूर्त- सकाळी 06:07 ते 11:44 पर्यंत.
अभिजीत मुहूर्त- सकाळी 11:51 ते 12:40 पर्यंत.
विजय मुहूर्त- दुपारी 02:18 ते 03:07 पर्यंत.
संधिप्रकाश मुहूर्त- संध्याकाळी 06:23 ते 06:47पर्यंत.
संध्या मुहूर्त- संध्याकाळी 06:23 ते 07:34 पर्यंत.
गणपती विसर्जनाची योग्य पद्धत
गणपतीचे विसर्जन कोणत्याही दिवशी दुपारनंतर करावे, अशी श्रद्धा आहे.
विसर्जन करण्यापूर्वी गणपती बाप्पाची कुटुंबासह पूर्ण श्रद्धा आणि भक्तीभावाने पूजा करावी, आरती करावी.
यानंतर त्यांना लाडू, फळे आणि मोदक अर्पण करावेत.
विसर्जनाच्या वेळी, 'गणपती बाप्पा मोरया' सारखी भगवान गणेशाची स्तुती करा आणि त्याच्या निरोपासाठी भक्तिगीते गा.
गणपती बाप्पाच्या मूर्तीचे पाण्यात विसर्जन करताना हळूहळू विसर्जन करावे.
पाणी स्वच्छ असावा याची काळजी घ्यावी. ज्या भांड्यात विसर्जन करत असाल त्यात गंगाजल मिसळून घ्यावे.
विसर्जनाच्या वेळी गणपती बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर यावे अशी इच्छा किंवा विनंती करा.
गणेशमूर्तीचे विसर्जन झाल्यावर ते पाणी पिंपळाच्या झाडाखाली किंवा भांड्यात टाकता येते.
गणपतीच्या मूर्तीसह पूजेत वापरण्यात येणाऱ्या साहित्याचे विसर्जन करावे.
अस्वीकरण: येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावरील विश्वासांवर आधारित आहे आणि ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही.