शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By
Last Modified: सोमवार, 9 सप्टेंबर 2019 (15:07 IST)

Ganpati Visarjan 2019: चुकून ही या मुहूर्तावर करू नये गणपती विसर्जन, मिळतील अशुभ फळ

Ganpati Visarjan 2019-  गणपती आगमनानंतर लगेच विषय येतो गणपती विसर्जनाचा. या वर्षी अनंत चतुर्दशी 12 सप्टेंबर रोजी गुरुवार येत आहे. विसर्जनाचे मुहूर्त खाली देण्यात आले आहे, त्याप्रमाणे जर विसर्जन केले तर नक्कीच तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल.
 
गणपती विसर्जनाचे शुभ मुहूर्त-
अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते. यंदा अनंत चतुर्दशी 12 सप्टेंबर रोजी होणार आहे. शास्त्रानुसार हा दिवस फारच शुभ मानला जातो. तसं तर या दिवशी कधीही गणपतीच्या प्रतिमेचे विसर्जन केलं जाते. पण विद्वानांनुसार, यंदा सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत आणि दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंतच वेळ प्रतिमा विसर्जनासाठी योग्य नाही आहे. त्याशिवाय तुम्ही केव्हाही विसर्जन करू शकता.  
गणपती विसर्जन की पूजा विधी-
 
भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला(अनंत चतुर्दशी) गणेश विसर्जन करतात. या दिवशी मोदकाचा नैवेद्य करावा. दुपारी आरती करून नैवेद्य दाखवावा. संध्याकाळी पुन्हा आरती करावी. गणपतीची मूर्ती आसनावरून खाली ठेवावी. मग ती ताम्हणात घ्यावी. मूर्ती घेणार्‍याने डोक्यावर टोपी घालावी. गणपती घेणार्‍याने मागे वळून पाहू नये. गणपतीला सर्व घरात फिरवून घर दाखवावे. विसर्जनाच्या ठिकाणी आरती करून, खिरापतीचा नैवेद्य दाखवावा. शक्यतो वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. नसल्यास स्वच्छ पाण्यात विसर्जन करावे. येताना विसर्जनाच्या पाण्यातील माती घरी आणावी, ती जेथे गणपतीची मूर्ती बसवली होती तेथे ठेवावी.