शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By

गणेश चतुर्थी 2020 : 7 गाठ बांधलेला धागा बाप्पाच्या चरणी ठेवा, 21 दिवसात भाग्य बदलेल

Ganesh Chaturthi 2020
* गणेश चतुर्थीला ब्रह्म मुहूर्तात उठून स्नान करून शुद्ध व्हावे. शुद्ध वस्त्र धारण करावे. या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान करणे श्रेष्ठ मानले गेले आहे.
 
* गणपती पूजन शुद्ध आसनावर बसून आपलं मुख पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावे याची काळजी घ्या.
 
* पंचामृताने गणपतीला स्नान घालावे नंतर चंदन, अक्षता, दूर्वा अर्पित करून कापूर जाळून पूजा आणि आरती करावी. गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवावा. लाल रंगाचं फुलं अर्पित करावं.
 
* श्री स्वरूप ईशान कोणामध्ये स्थापित करावे आणि त्यांचे श्री मुख पश्चिमीकडे असावे.
 
* आता एका सुती दोरा घ्यावा. याला सात गाठी बांधाव्या आणि बाप्पाच्या चरणी ठेवून द्यावे. विसर्जनापूर्वी तो दोरा आपल्या पर्समध्ये ठेवावा. या उपायाने धन, संपत्ती, सुख, समृद्धी, यश, वैभव, संपन्नता, सौभाग्य, ऐश्वर्य आणि कीर्ती प्राप्त होते. विषम परिस्थितीत देखील रक्षा करण्याचे सामर्थ्य यात असतं.