शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By
Last Modified: गुरूवार, 9 सप्टेंबर 2021 (20:03 IST)

श्री गणेश स्थापने च्या अनेक शुभेच्छा !!

वातावरण जाहले मंगल मंगल,
पवित्र्या ची लागलीसे चाहूल,
विघ्न विनायक निघाले नाचत,
होतें  सारे त्याची वाटच पाहत,
करा स्वागत श्री गणरायाचे सकळ,
निश्चित मिळते त्याचे ,शुभ फळ,
साधे बाधे स्वागत करा मनोभावे,
उगा नका करू अवडंबर, देखावे,
साधा दाखवा नैवेद्य, नमवा शीर,
भावाचा भुकेला तो पावेल सत्वर,
झगमगाट नको, गोंगाट नकोच त्यास,
स्वच्छ ठेवा परिसर ,मांगल्य आसपास,
टळतील विघ्न ,टळेल निश्चित आपदा,
श्री गणेशाचे नाव मुखी नित्य असुद्या!
.....श्री गणेश स्थापने च्या अनेक शुभेच्छा !!