गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. शिक्षक दिन
Written By
Last Updated : रविवार, 5 सप्टेंबर 2021 (10:08 IST)

Teacher's Day Wishes in Marathi शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

सामान्य शिक्षक सांगतात,
चांगले शिक्षक स्पष्ट करतात,
वरिष्ठ शिक्षक प्रात्यक्षिक करतात 
आणि 
तुमच्या सारखे महान शिक्षक प्रेरित करतात
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा ...!
 
जे आपल्याला एक व्यक्ती म्हणून घडवतात 
आणि चांगल्या-वाईटाची ओळख करून देतात, 
देशातील या निर्मात्यांना आम्ही करतो शत शत प्रणाम. 
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश…
 
अपूर्णाला पूर्ण करणारा, 
शब्दांनी ज्ञान वाढविणारा, 
जगण्यातून जीवन घडविणारा,
तत्त्वातून मूल्ये फुलविणार्‍या,
ज्ञानरुपी गुरुंना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
गुरूने दिला हा ज्ञानरूपी वारसा… 
शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
माता गुरू आहे, 
पिताही गुरू आहे
विद्यालयातील शिक्षक गुरू आहेत
ज्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळालं त्या सर्व व्यक्ती गुरू आहेत. 
या शिक्षक दिनाच्या दिवशी सर्व गुरूजनांना कोटी कोटी प्रणाम
 
आई देते आयुष्य वडील देतात सुरक्षा 
पण शिक्षक शिकवतात आपल्याला जगणं
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
मनात माझ्या ज्ञानाचा लावलात दीपक 
अशा माझ्या गुरूवर्य शिक्षकांना प्रणाम 
शिक्षक दिन शुभेच्छा 
 
जेव्हा बंद होतात सर्व दरवाजे
तेव्हा नवा रस्ता दाखवता
फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर 
जीवन जगणंही शिकवता 
शिक्षकदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
 
गुरुविण न मिळे ज्ञान
ज्ञानाविण जगी न होई सन्मान
जीवन भवसागर तराया
चला वंदूया गुरुराया
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
शिक्षकांशिवाय ज्ञान नाही 
शिक्षकांशिवाय मान नाही 
आपलं जीवन यशस्वी बनवणाऱ्या 
ज्ञानाचा दिपक तेवत ठेवणाऱ्या
सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा