पुण्यातील सारसबागेतील गणपती पूर्वी 'तळ्यातील गणपती' या नावाने ओळखला जात होता. सवाई माधवराव पेशवे यांनी थेऊरच्या उजव्या सोंडेच्या गणपतीची प्रतिकृती १७ व्या शतकात सारसबागेच्या तळ्यात स्थापन केली होती. त्यामुळे 'तळ्यातील गणपती' अशी त्या काळी सारसबागेतील गणपतीची ओळख होती.