शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गावोगावचे गणपती
Written By
Last Modified: बुधवार, 6 सप्टेंबर 2023 (15:17 IST)

Major Ganesha Mandals मुंबईतील प्रमुख गणपती मंडळे....

ganesha mumbai
Major Ganesha Mandals in Mumbai….गणपती घरोघरी यायला फक्त दिवस  बाकी आहे. यंदाचा गणेशोत्सव खास आहे. कारण दोन वर्षानंतर कोणत्याही निर्बंधाशिवाय गणपती उत्सव धूमधडाक्यात आणि जल्लोषात साजरा होणार आहे. तसंच यावेळी गणेश मूर्तींच्याउंचीवरही कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळे मुंबईत पुन्हा गणपतीचा उत्सव थाटात होणार आहे. उंच गणेशमूर्ती आणि भव्यदिव्य सजावट हे मुंबईतील गणेशोत्सवाचं मुख्य आकर्षण असतं. वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात मुंबईतील गणेश आगमन सोहळा सुरू होणार  आहे. पाहूया मुंबईतील प्रमुख गणपती मंडळे.
मुंबईत अनेक गणेश मंडळे आहेत. मात्र, त्यातील गिरगाव येथील केशवजी नाईक चाळमधील गणपती, चिंचपोकळी येथील चिंतामणी, लालबागचा राजा, परळ येथील नरे पार्कचा गणपती, गणेश गल्लीचा राजा हे मुंबईतील गणपती विशेष प्रसिद्ध आहेत. गणेशोत्सवात महाराष्ट्राच्या विविध ठिकाणाहून या गणपतींच्या दर्शनासाठी भाविक मुंबईत येत असतात.
 
केशवजी नाईक चाळ, गिरगाव
मुंबईतील सर्वात जुन्हा गणेश मंडळ म्हटले की, गिरगाव येथील केशवजी नाईक चाळीचा गणपती डोळ्या समोर येतो. हे मंडळ 1893 साली मुंबईत सुरू झाले होते. हे मंडळ आपल्या पर्यावरण-अनुकूल उत्साहासाठी आणि लहान गणेश मूर्तीसाठी विशेष ओळखले जाते. तसेच स्वातंत्र्यपूर्व काळात हा गणपती राजकीय आणि सामाजिक चळवळींचे व्यासपीठ बनले होते. यंदा हे गणेश मंडळाला 127 वर्ष पूर्ण होऊन 128 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. तर मुंबईल पहिला गणेश मंडळ म्हणून या मंडळाकडे पाहिले जाते.
चिंचपोकळीचा चिंतामणी, चिंचपोकळी
 
चिंचपोकळीचा चिंतामणी
चिंचपोकळीचा चिंतामणी (चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ) 1920 मध्ये स्थापना झाली होती. तर मुंबईतले दुसरे सर्वात जुन्या गणेश मंडळापैकी एक आहे. तसेच हे मंडळ अनेक सामाजिक उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. यंदा या मंडळाला 100 वर्ष पूर्ण झाले आहेत.
 
कसे पोहचाल ?
चिंचपोकळी स्टेशनवरून तुम्ही पायी चालत जाऊन चिंतामणीचे दर्शन घेऊ शकता.
मुंबईचा राजा, गणेश गल्ली
 
गणेशगल्लीत गणेश मूर्ती
गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालबाग-परळच्या कष्टकरी, गिरणी कामगारांनी 1928 साली गणेशगल्लीत गणेश मूर्ती बसवण्यास सूरूवात केली होती. सर्वप्रथम 1977 साली या गणेश मंडळाने 22 फुट उंच गणेशमूर्ती बसवली होती. तेव्हापासून आजपर्यंत मंडळांने एकापेक्षा एक आकर्षक उंच गणेशमूर्ती हे गणेश गल्लीचे वैशिष्ट आहे. गणेश गल्लीचा गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविक रिघ लावतात.
 
कसे पोहचाल ?
बेस्ट बस, टॅक्सी किंवा करी रोडवरून अगदी चालत जाऊन गणपतीचे दर्शन घेऊ शकतात. 24 तास गणपती दर्शन सुरू असल्याने रात्रीच्या वेळीही गणपती मंडळांना भेट देण्याची मज्जा काही औरच असते.
 
लालबागचा राजा, लालबाग
‘लालबागचा राजा’
 
सन १९३१ साली लालबागच्या पेरू चाळीतली बाजारपेठ बंद पडली. बाजारपेठेसाठी नवी जागा मिळाल्यास गणपती बसवू, असा नवस तेव्हा स्थानिक मच्छिमारांनी आणि व्यापाऱ्यांनी केला. त्यानुसार १२ सप्टेंबर १९३४ रोजी सध्याच्या लालबाग मार्केटमध्ये गणपती बसवायला सुरूवात झाली. मात्र, तोच गणपती आता ‘लालबागचा राजा’ या नावाने जगभरात ओळखला जातो.
 
कसे पोहचाल ?
मुंबईत ट्राफिक टाळायचा एक पर्याय म्हणजे रेल्वेप्रवास. त्यामुळे लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायचे असल्यास मध्य रेल्वेच्या करी रोड स्टेशनवर उतरा. स्टेशनवरून लालबागचा राजा अवघ्या काही मिनिटांत पायी पोहचू शकता.
 
तेजुकाया गणपती, लालबाग
तेजुकाया सार्वजनिकग गणेशोत्सव मंडळ हा लालबाग मधील प्रसिद्ध गणेश मंडळांपैकी एक आहे. 1947 सालापासून या मंडळाला सुरूवात झाली होती. हत्तीसारखे गंडस्थळ, सुपासारखे कान आणि लंबोदर अशी 21 फूट उंचीची गणेशमूर्ती हे या मंडळाचे वैशिष्ट्य. तसेच 2 कोटींपेक्षा जास्त सोन्याच्या दागिन्याने हा गणपती नटलेला आहे.

जीएसबी गणपती, किंग्ज सर्कल
जीएसबी गणपती
कर्नाटकातून आलेल्या गौड सारस्वत ब्राह्मण समुदायाने माटुंगा, किंग्ज सर्कल येथे १९५५ सालापासून सार्वजनिक गणपती बसवायला सुरूवात केली होती. मुंबईतला सर्वात श्रीमंत गणपती अशी या जीएसबी गणपतीची ओळख आहे. कारण या गणपतीची आभूषणे तर शुद्ध सोन्याची आहेतच, आणि गणपतीचे अनेक अवयवही चक्क सोन्याने बनवलेले आहेत. कोट्यवधी रुपयांच्या दागिन्यांनी मढवलेल्या हा गणपती आहे.
 
कसे पोहचाल ?
दादर, माटुंगाहून बेस्ट बस किंवा टॅक्सीने तुम्ही वडाळ्यात येऊ शकता.रेल्वेच्या हार्बर मार्गावरील किंग्ज सर्कल स्टेशनवरून तुम्ही अगदी चालत काही मिनिटांत वड्याळ्याच्या जीएसबी गणपतीचे दर्शन घेऊ शकता.
 
नरे पार्कचा, परळचा राजा
या मंडळाची 1947 साली उत्साहाने सुरूवात झाली. नरे पार्कचा राजा किंवा परळचा राजा अशा नावाने सर्वत्र ओळखला जातो. परळच्या राज्याला भेट देण्यासाठी असंख्य भाविक दर वर्षी येत असतात. यंदा या मंडळाला 72 वर्ष पूर्ण झाले आहे.
 
मुंबईतील प्रसिद्ध  मंडाळाची  कलाकृती पाहण्यासाठी सगळेच उत्सुक असतात. परंतु रस्ता माहिती नसल्यामुळे भाविकांचा गोंधळ उडून जातो. यंदा१९  सप्टेंबरच्या रात्री पासून ते वरील मंडळाच्या गणेश मूर्तीचे दर्शन गणेशभक्तांना मिळणार आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor