श्री इच्छामणी गणेश
- अंजली राऊत
|
इच्छामणी गणेश मंदिराची स्थापना गुढीपाडवा या दिवशी झाल्याने या नवीन वर्षापासून १२ दिवस नामसप्ताह आयोजित करण्यात येतो. या काळात कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम केले जातात. तसेच इतर सणासुदीच्या दिवसात भागवत कथा, रामायण, महाभारत यावर देखील प्रवचन, कथा घेतले जाते. याप्रसंगी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. माघ शुध्द चतुर्थी या गणेश जयंती दिवशी गणेशयागाचे आयोजन करण्यात येते. या मंदिरात गणेशमूर्तीही संगमरवराची असून, गणेशाच्या आजूबाजूला रिध्दी व सिध्दीच्याही मूर्ती आहेत आणि या तीनही मूर्तींवर चांदीचे छत्र असून, मागील बाजूही चांदीची बनविण्यात आली आहे. मंदिराचा गाभारा प्रशस्त आहे. या गाभार्यात विनायकी चतुर्थी व संकष्टी चतुर्थीला ५१ वेळा अथर्वशीर्षाचे पठण केले जाते.
इच्छामणी गणेश मंदिर प्रसिध्द असून, नाशिकवासीय तर येथे दर्शनासाठी येतात. शिवाय परप्रांतीयांमधील भाविकही गणरायाचे दर्शन घेण्यात येथे येत असतात. गणेशोत्सवातील दहा दिवसही कार्यक्रम होत असतात. अशा वेळेस मंदिरात विद्युत रोषणाई, रांगोळी असे सुशोभिकरण करण्यात येते. मूर्तीला २१ दुर्वांची माळ, २१ नारळांचा हार घालण्यात येतो. यावेळेस मूर्ती अतिशय सुंदर दिसते. सकाळ व रात्री आरती करण्यात येते.
