- धर्म
» - हिंदू
» - देव-देवता
सरस्वती
तीन देवींमधली पहिली देवी सरस्वती मानली जाते. त्यानंतर लक्ष्मी व दुर्गा आहेत. जगाचा निर्माता ब्रम्हदेवाची सरस्वती ही पत्नी. सरस्वतीला विद्येची व कलेची देवता मानले जाते. ऋग्वेदात सरस्वती नदी नावाची देवी असल्याचा उल्लेख आहे. मोर हे तिचे वाहन. पुराणात केलेल्या वर्णनानूसार तिला चार हात असून तीने वीणा हातात धरली आहे.