सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुढीपाडवा
Written By

गुढी उभारण्याची योग्य पद्धत

सर्वात आधी गुढी उभारत असलेली जाग स्वच्छ करुन रांगोळीने सुशोभित करावी. गुढी उभारण्याच्या जागी रांगोळीने स्वस्तिक काढून त्याच्या मध्यबिंदूवर हळद-कुंकू वाहावे.
गुढी उभारण्यासाठी लाकडाची काठी स्वच्छ पुसन घ्यावी.
बांबूच्या टोकास भरजरी कापड बांधून त्यावर साखरेच्या गाठी, कडुलिंबाची पाने, आंब्याची डहाळी आणि लाल फुलांचा हार बांधून वर चांदी किंवा तांब्याचा कलश सजवून गुढी उभी करावी.
गुढी उभी करताना ती दरवाजाच्या बाहेर परंतू उंबरठ्यालगत उभी करावी तसेच घरातून पाहिल्यास उजव्या बाजूला उभी करावी. गुढी भूमीवर पाट ठेवून किंवा खाली तांदळाचा ढिगार करुन त्यावर उभी करावी. 
गुढी जमिनीवर उंबरठ्यालगत परंतू थोडीशी झुकलेल्या स्थितीत उभी करावी.
या गुढीला ब्रह्मध्वज असही म्हटले जाते. ब्रह्मध्वजाची पुढील मंत्राने प्रार्थना करावी.
ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद। प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !!
गुढीला उभारल्यावर हळद, कुंकू, फुले वाहून तिची पूजा करुन नैवेद्य दाखवावा. 
तसेच सूर्यास्ताच्या वेळी गुळाचा नैवेद्य दाखवून गुढी उतरवावी.